18 कोटींच्या निधीतून होणार पुलाची उभारणी.!मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

18 कोटींच्या निधीतून होणार पुलाची उभारणी.!मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न.!

दि. 22.12.2023
Vidarbha News India 
18 कोटींच्या निधीतून होणार पुलाची उभारणी.!
मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न.!
- अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली.!
विदर्भ न्यूज इंडिया 
गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील देवदा नाल्यावर पुलाचे बांधकाम करण्यासाठी शासनाने १८ कोठी रुपयांची निधी मंजूर केले असून गुरुवार (२१ डिसेंबर ) रोजी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते ऋतुराज हलगेकर,देवदाचे सरपंच केसरी पाटील,तहसीलदार चेतन पाटील,बिडीओ एल बी जुवारे, सार्वजनिक बांधकाम मंडळ गडचिरोलीचे अधीक्षक अभियंता श्रीमती नीता ठाकरे,नितीन वायलालवार, माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास,मुलचेरा नगरपंचायत चे उपाध्यक्ष मधुकर वेलादी, भाजपच्या बंगाली सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा,रेगडीचे सरपंच, सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक-२  गडचिरोलीचे इतरही अधिकारी व कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुलचेरा आणि चामोर्शी या दोन तालुक्यांना विभागणाऱ्या दीना नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात या भागातील नागरिकांना जीव धोक्यात टाकून जल प्रवास करावा लागत होता.या नदीवर पुलाचे बांधकाम व्हावे म्हणून मागील अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांची मागणी होती. बरेच लोकप्रतिनिधींनी सुद्धा शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. मात्र स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही या नाल्यावर पुलाचे बांधकाम होऊ शकले नाही.मात्र, महायुती सरकार मधील मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार डॉ देवराव होळी यांनी या भागातील नागरिकांची अडचण लक्षात आणून देत पूल बांधकामासाठी निधी मंजूर करावे ही मागणी रेठून धरली.
अखेर देवदा येथील दिना नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी शासनाने तब्बल १८ कोटी रुपयांची निधी मंजूर केली. त्वरित या नदीवर पुलाचे बांधकाम व्हावे म्हणून टेंडर काढले.मेसर्स,प्रशांत कन्स्ट्रक्शन कंपनी,गडचिरोली यांना टेंडर मिळाले असून गुरुवारी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते पूल बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि आमदार डॉ. देवराव होळी यांनी प्रत्यक्ष पाहणी करत विलंब न लावता दिलेल्या कालावधीत सुसज्ज असे पुलाचे बांधकाम करण्याचे निर्देश संबंधित कंपनीला दिले.

तीन तालुक्यातील नागरिकांना दिलासा
जिल्हा मुख्यालय जाण्यासाठी एटापल्ली आणि मुलचेरा तालुक्यातील नागरिकांना हा अत्यंत शॉर्टकट रस्ता आहे.एटापल्ली व मुलचेरा तालुक्यातील नागरिक बारमाही याच रस्त्याचा वापर करतात.एटापल्ली वासीयांना जिल्हा मुख्यालय जाण्यासाठी जवळपास ७० किलोमीटर अंतर कमी पडते.एवढेच नव्हे तर गडचिरोली आणि चामोर्शी तालुक्यातून ये जा करणारे कर्मचारी आणि इतर कामासाठी येणारे नागरिक सुद्धा याच मार्गाचा वापर करतात.पावसाळ्यात त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. आता या नदीवर पुलाचे बांधकाम होत असल्याने मुलचेरा, एटापल्ली आणि चामोर्शी या तीन तालुक्यातील नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->