दि. ०२ डिसेंबर २०२३
Vidarbha News India
कार्यकर्त्यांना जागे करण्यासाठीच रोहित पवार याची संघर्ष यात्रा : - आमदार अनिल देशमुख
Rohit pawar-ncp
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : आगामी 12 डिसेंबरला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमीत्य आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात 24 ऑक्टोबरला पुण्यात सुरू झालेल्या संघर्ष यात्रेचा समोरोप नागपूर येथे होत असून राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार अनिल देशमुख यांनी सर्कीट हाऊस येथील आयोजित पत्रकार परिषदेतून दिली.
rohit pawar-ncp यावेळी पत्रकार परीषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, विजय गोरडवार, अॅड. संजय ठाकरे, गुरूदेव पाटील, राजेंद्र वैद्य, अजित चुधरी, सुरेश सा. पोरेड्डीवार, राजू आत्राम, प्रकाश ताकसांडे, श्याम धाईत, प्रदिप चुधरी आदी उपस्थित होते. rohit pawar-ncp
गडचिरोली जिल्ह्यातील पक्षाच्या आढावा बैठकीच्या निमीत्ताने आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणााले की, जिल्ह्यातील अवकाळी पावसाने शेतकर्यांचा धान पाण्यात गेला असल्याने शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले. rohit pawar-ncp राज्य शासनाने तत्काळ शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. गेल्या जुलै महिन्यात अतिवृष्टीने नुकसान झालेले शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतिक्षेतच असलयाचेही त्यांनी यावेळी सांगितले. rohit pawar-ncp जिल्ह्यात वन्यप्राण्यांची मोठी समस्या असून वन्यप्राण्यांमुळे जीव गेलेल्या कुटूंबीयांना मदत मिळावी.
सुरजागड प्रकल्पात स्थानिक युवकांना रोजगार मिळावा, मात्र परप्रांतीयांना रोजगार मिळत असल्याने स्थानिक युवकांना दाबले जात असल्याची खंतही यावेळी त्यांनी व्यक्त केली. rohit pawar-ncp गडचिरोली जिल्ह्यातील 4 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम पूर्णावस्थेत असून पदमान्यता नसल्याने लोकार्पणाच्या पतिक्षेत आहेत. त्या सेवा त्वरित शासनाने सुरू कराव्या. मेडीगठ्ठा प्रकल्पामुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना योग्य प्रमाणात मदत मिळाली नसल्याने शेतकरी हवालदील झाले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. rohit pawar-ncp