एसटीच्या तिकीटाचं पेमेंट आता बसमध्येच UPI द्वारेही करता येणार.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

एसटीच्या तिकीटाचं पेमेंट आता बसमध्येच UPI द्वारेही करता येणार.!

दि. १०.१२.२०२३ 

Vidarbha News India 

एसटीच्या तिकीटाचं पेमेंट आता बसमध्येच UPI द्वारेही करता येणार.!

विदर्भ न्यूज इंडिया 

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सर्वच प्रमुख आगारांमधील बसेसमध्ये UPI द्वारे पैसे देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात सुरुवात केली आहे. आजपर्यंत रोख पैसे देण्याचा किंवा आधीच तिकीट ऑनलाइन बुक करणे असे दोनच पर्याय होते.

२५ ऑगस्ट २०२२ पासून याची काही स्थानकांममधील ठराविक बसेसमध्येच चाचणी सुरू होती मात्र आता जवळपास सर्व प्रमुख स्थानाकांमधील बसेसमधी ही सोय उपलब्ध होत आहे!

मात्र आता बसमध्येच वाहकांना ETI मशीन्स देण्यात आल्या असून याद्वारे आपण मशीनवरील QR स्कॅन करून आपल्या फोनमधील फोनपे, गूगल पे, Paytm UPI अशा कोणत्याही UPI ॲपमार्फत स्कॅन करून लगेच ऑनलाइन पैसे देऊन पेमेंट पूर्ण करू शकता! यामुळे लवकरच सर्व एसटी बसमध्येही कॅशलेस (रोख पैसे जवळ न ठेवता) प्रवास करता येईल!

ही सेवा आत्ता हळूहळू उपलब्ध करून देण्यात असल्यामुळे काही ठिकाणी हे मशीन उपलब्ध नसल्याने हा नवा पर्याय कदाचित मिळणार नाही असं होऊ शकतं. प्रवास करताना तो विचार करूनच सध्यातरी प्रवास करा. येत्या काही दिवसात/महिन्यात सर्वच बसेसमध्ये हे नक्की उपलब्ध होईल!

MSRTC च्या एसटी बसमधून प्रवास करताना UPI द्वारे कसे पैसे द्यायचे ?

  1. कंडक्टर/वाहक आपल्याकडे आल्यावर कोणत्या ठिकाणी उतरायचं आहे आणि किती प्रवासी एकत्र आहोत ते सांगा.
  2. त्यानुसार वाहक तुम्हाला तुमच्या तिकीटाची एकूण रक्कम सांगतील.
  3. त्यांना तुम्ही UPI द्वारे पैसे देणार आहात असे सांगा.
  4. मग ते तुम्हाला त्यांच्याकडील मशीन मध्ये ती रक्कम टाकून त्याचा QR कोड तयार करून तुम्हाला दाखवतील.
  5. तुम्ही वापरत असलेल्या UPI ॲप मध्ये जाऊन Scan QR चा पर्याय निवडा आणि तो कोड स्कॅन करा.
  6. आता रक्कम योग्य असल्याची खात्री करून पिन टाकून पेमेंट करा.
  7. पेमेंट यशस्वी झालं असेल तर तुम्हाला मेसेज येईल आणि वाहक तुम्हाला तिकीट देतील.
  8. तिकीटावर नेहमीच्या माहितीसोबत तुम्ही UPI मार्फत पैसे दिले असा उल्लेख असेल.

आता एसटीचं तिकीट बुक करण्यासाठी खालील पर्याय आहेत :

  • एसटी बसमध्येच : एसटी बसमध्येच कंडक्टर/वाहकांकडून ऐनवेळी तिकीट घेऊन त्याचे पैसे रोख किंवा आता UPI मार्फत फोनद्वारेही देता येतील.
  • महामंडळाच्या अधिकृत द्वारे : MSRTC Mobile Reservation App on Google Play
  • महामंडळाच्या वेबसाइटद्वारे : https://public.msrtcors.com/ticket_booking/index.php या लिंकवर जाऊन अकाऊंट रजिस्टर करून तिकीट बुक करत UPI/Debit Card/Credit Card/Wallet असे बरेच ऑनलाइन पर्याय वापरुन पैसे देता येतील. याद्वारे बुकिंग केल्यावर त्याची प्रिंट काढून किंवा याचा आलेला ईमेल कंडक्टरना दाखवून प्रवास करू शकता.
  • Redbus/Abhibus/MakeMyTrip/GoIbibo/Paytm असे बाहेरचे पर्याय वापरुनसुद्धा तिकीट बुकिंग करता येतं! बुकिंग पूर्ण झाल्यावर याचा आलेला ईमेल कंडक्टरना दाखवून प्रवास करू शकता.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी प्रकाशित केलेलं पत्रक खाली वाचू शकता.

उपमहाव्यवस्थापक नि.स.क्र.१. २ व ३.
विभाग नियंत्रक,
रा.प. मुंबई/ पालघर / ठाणे/ रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग / पुणे/ सातारा / सांगली/ कोल्हापूर/ सोलापूर / नाशिक /धुळे/ जळगांव / अहमदनगर/छ. संभाजीनगर / धाराशिव / बीड / नांदेड / लातूर/ परभणी / जालना / नागपूर/ भंडारा /चंद्रपूर/ वर्धा / गडचिरोली / अकोला /अमरावती/यवतमाळ/ बुलढाणा विभाग.

विषयः- नवीन अॅन्ड्रॉईड ईटीआय मशिन द्वारे युपीआय पेमेंट बाबत.

उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, रा.प. महामंडळात नवीन अॅन्ड्रॉईड ईटीआय मशिन सर्व आगारात कार्यान्वित करण्यात आलेले आहे. सध्याच्या माहिती व तंत्रज्ञान युगात सर्वत्र रोकड विरहित (Cashless) व्यवहार करण्यात येत आहे. रा.प. महामंडळातही रोकड विरहित (Cashless) सुविधा सर्व प्रवाशांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. रा.प. महामंडळाद्वारे प्रथम टप्पा मध्ये युपीआय QR Code द्वारे पैसे घेण्याची कार्यपध्दती सुरु करण्यात येत आहे.

याच्या पुढील टप्प्यात डेबीट व क्रेडीट कार्ड व्यवहार करण्याची सुविधा टप्प्यात उपलब्ध होणार आहे. तरी सद्यस्थिती वाहका द्वारे QR Code मार्फत व्यवहार करण्याची मानक कार्यपध्दती (SOP) सोबत जोडण्यात येत आहे. सदर व्यवहार करताना कोणतेही ट्रान्झेक्यशन फेल झाल्यास एअरटेल क्रमांकाद्वारे ४०० व इतर मोबाईल क्रमांकाद्वारे ८८००६८८००६ या क्रमांकास संपर्क करावा. तसेच ई-मेल wecare@airtelbank.com येथे संपर्क करावा. सदर क्रमांक हे २४ तास उपलब्ध आहेत.
तरी सर्व वाहकांना याबाबत अवगत करण्यात यावे. तसेच सदर मानक कार्यपध्दती (SOP) वाहकांच्या निदर्शनास आणुन देण्यात यावी व प्रवाशांना युपीआय QR Code द्वारे व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.

सोबतः- मानक कार्यपध्दती (SOP). (पान ०१ ते ०६)

प्रतः-
१. वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी यांना वरील प्रमाणे माहिती व कार्यवाहीसाठी.
२. उपमहाव्यवस्थापक (मावतं) यांना वरील प्रमाणे माहिती व कार्यवाहीसाठी.
३. मे. ईबिक्स कॅश मोबिलीटी सॉफ्टवेअर इंडिया लि. यांना वरील प्रमाणे माहिती व कार्यवाहीसाठी.

◆ एसटी महामंडळाचा अखेर कॅशलेस प्रवास सुरु... आता UPI द्वारे करता येणार आपल्या तिकिटाचे पेमेंट...


Share News

copylock

Post Top Ad

-->