दि. 20.12.2023
Vidarbha News India
गोंडवाना विद्यापीठाच्या इमारतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्या; आ.डॉ. देवराव होळी यांची मागणी
- आमदार डॉ. देवराव होळी यांची मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी
- आमदार डॉ. देवराव होळी यांच्या विनंतीवरून गोंडवाना विद्यापीठा संदर्भात विधानभवनात मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न.!
- पुरेसा निधी उपलब्ध करून देणार तसेच रिक्त पदभरती संदर्भातही लवकरच निर्णय होणार मंत्री चंद्रकांत पाटील यांचे सकारात्मक आश्वासन
विदर्भ न्यूज इंडीया
प्रतिनिधी / गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या इमारतीचे भूमिपूजन महामहिम राष्ट्रपती यांचे हस्ते होऊन बरेच दिवस झाले परंतु अजून इमारतीचे बांधकाम सुरू झाले नाही. त्यामुळे इमारतीच्या डिझाईनला तातडीने मंजुरी देऊन विद्यापीठाच्या इमारतीचे बांधकाम लवकरच लवकर सुरू करावे व विद्यापीठातील रिक्त पदांबाबत तातडीने निर्णय घ्यावा.
आ. डॉ. देवराव होळी यांच्या विनंतीवरून गोंडवाना विद्यापीठा संदर्भात विधानभवनात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांनी बैठकीचे आयोजन केले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या प्रमूख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला आ.डॉ. देवराव होळी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, संचालक उच्चवतंत्र शिक्षण पुणे, विद्यापीठाचे कुलसचिव, यांचे सह गोंडवाना विद्यापीठ व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.