गडचिराेलीत नक्षलवाद्यांनी वाहने पेटवली, 22 डिसेंबरला भारत बंदची घाेषणा.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

गडचिराेलीत नक्षलवाद्यांनी वाहने पेटवली, 22 डिसेंबरला भारत बंदची घाेषणा.!

दि. 20.12.2023

Vidarbha News India 

Gadchiroli : गडचिराेलीत नक्षलवाद्यांनी वाहने पेटवली,  22 डिसेंबरला भारत बंदची घाेषणा.!

विदर्भ न्यूज इंडिया 

गडचिराेली : गडचिराेली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. हिदूर-दोबुर-पोयारकोटी या रस्त्याच्या कामासाठी आणलेले तीन ट्रॅक्टर आणि एक जेसीबी नक्षलवाद्यांनी जाळून टाकले आहेत.डचिराेली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. हिदूर-दोबुर-पोयारकोटी या रस्त्याच्या कामासाठी आणलेले तीन ट्रॅक्टर आणि एक जेसीबी नक्षलवाद्यांनी जाळून टाकले आहेत.

घटनास्थळी 22 डिसेंबरचा भारत बंद (naxals calls bharat bandh on 22 december) यशस्वी करा असे हिंदीमधील पत्रक आढळून आले आहे. (Vidarbha Maharashtra News)

भामरागड तालुक्यातील हिदूर-दोबुर-पोयारकोटी या रस्त्याचे बांधकाम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. या कामासाठी मंगळवारी रात्री हिदूर गावात वाहने ठेवण्यात आली. या गावात नक्षलवादी आले. त्यांनी तीन ट्रॅक्टर आणि एक जेसीबीला आग लावली. त्यामुळे चारही वाहने जळून खाक झाली. यामध्ये कंत्राटदराचे मोठे नुकसान झाले आहे.

या घटनेनंतर नक्षलवाद्यांनी घटनास्थळी पत्रक टाकले. या पत्रकात 22 डिसेंबर को भारत बंद सफल बनाओ असे आवाहन त्यांनी हिंदी भाषेत लिहिलेल्याची दिसून येत आहे.

बदला सप्ताह..!

एका प्रवक्त्याच्या माहितीनूसार देशातील 40 टक्के खनिजे झारखंडमध्ये आहेत. ज्याची वेगवेगळ्या खाजगी कंपन्यांकडून लूट केली जात आहे. या लुटीविरोधात आम्ही क्रांतिकारी चळवळ चालवत आहोत.

त्यामुळे या कंपन्यांना खनिजांची पूर्णपणे लूट करता येत नाही. अशा स्थितीत भाजप सरकारच्या सहकार्याने क्रांती आंदोलन चिरडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या सर्व बाबींच्या अनुषंगाने बदला सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या हल्ल्यांच्या निषेधार्थ नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीने 16 डिसेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीत बदला सप्ताह साजरा करण्याची घोषणा केली आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->