राज्यात थंडीचा कडाका वाढणार ! सर्वात कमी तापमान 'या' शहरात... - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

राज्यात थंडीचा कडाका वाढणार ! सर्वात कमी तापमान 'या' शहरात...

दि. 18.12.2023 

Vidarbha News India 

राज्यात थंडीचा कडाका वाढणार ! सर्वात कमी तापमान 'या' शहरात...

विदर्भ न्यूज इंडिया 

मुंबई : उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात तीव्र झाल्याने त्या भागातून शीतलहरी राज्याकडे येतच आहेत. दरम्यान, गुजरात किनारपट्टीवर वार्‍याची चक्रीय स्थिती तयार झाल्याने महाराष्ट्रात सोमवारपासून थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

गेले तीन दिवस राज्यात किमान तापमानाचा पारा 12 ते 13 अंशावर आहे. रविवारी यात किंचित घट झाली. मात्र सोमवार (दि. 18) पासून मध्य प्रदेश व गुजरातमधून शीतलहरीचा प्रवास राज्याच्या दिशेने सुरू होत आहे. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात दीड ते दोन अंशांनी घट होईल, असा अंदाज आहे. रविवारी राज्यातील बहुतांश शहरांचे तापमान 12 ते 13 अंशावर खाली आले होते. रविवारी नाशिक शहराचा पारा राज्यात सर्वात नीचांकी ठरला. तेथे 12.5 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले.

रविवारचे राज्याचे किमान तापमान
नाशिक 12.6, पुणे 13.2, महाबळेश्वर 13.5, जळगाव 12.7, छत्रपती संभाजीनगर 13.8, ब्रह्मपुरी 13.0, चंद्रपूर 13, गडचिरोली 12, गोंदिया 12.8, नागपूर 13, वाशिम 13.8, वर्धा 13.5, यवतमाळ 13.2, परभणी 15.5, नांदेड 17, अकोला 14.5, अमरावती 14.9, बुलडाणा 14.0, मुंबई 22.4, रत्नागिरी 22.6, कोल्हापूर 19.1, मालेगाव 14.2, सांगली 18.2, सातारा 18.1 सोलापूर 19.5, धाराशिव 18.6.


Share News

copylock

Post Top Ad

-->