दि. 24.12.2023
चामोर्शी शहरातील २.५ कोटी रुपयांच्या विकास कामांचे आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते भूमिपूजन.!
- चामोर्शी शहरात विकास कामांचा धडाका.!
- चामोर्शी नगराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे प्रतिपादन.!
विदर्भ न्यूज इंडिया
प्रतिनिधी / गडचिरोली : चामोर्शी शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला असून कोणत्याही परिस्थितीत चामोर्शी शहराच्या विकासाकरिता निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आ.डॉ. देवराव होळी यांनी चामोर्शी येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी केले.
आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते आज चामोर्शी शहरातील २.५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगीच्या चामोर्शीच्या नगराध्यक्ष जयश्री वायललवार, उपाध्यक्ष लोमेश बुरांडे, वैभव भिवापुरे, भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, युवा मोर्चा महामंत्री प्रतीक राठी, भोजराज भगत, विजय गेडाम यांचे सह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.