विविध मागण्यासाठी घरकूल ऑपरेटर यांचे कामबंद आंदोलन.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

विविध मागण्यासाठी घरकूल ऑपरेटर यांचे कामबंद आंदोलन.!

दि.०४.१२.२०२३
Vidarbha News India 
विविध मागण्यासाठी घरकूल ऑपरेटर यांचे कामबंद आंदोलन.!
विदर्भ न्यूज इंडिया 
गडचिरोली : घरकूल योजनेच्या प्रभावी अमलबजावणी करीता कार्यरत असलेले कंत्राटी कर्मचारी प्रोग्रामर व ऑपरेटर यांच्या मानधनात वाढ तसेच विविध मागण्या करीता प्रोग्रामर व ऑपरेटर यानी २८ नोव्हेंबर २०२३ पासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे.
या संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांना निवेदन देण्यात आले आहे. याप्रसंगी प्रोग्रामर व ऑपरेटर उपस्थीत होते.
◆  या आहेत मागण्या...
वयाच्या ५८ वर्षापर्यंत नोकरीची हमी द्यावी, ग्रामविकास विभागाअंतर्गत येणाऱ्या उमेद, मनरेगा, स्वच्छ भारत मिशन च इतर सर्व विभागांमध्ये ज्याप्रमाणे एचआर पॉलिसी लागू आहे तशीच सर्व ग्रामीण गृहनिर्माण यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांना लागू कराव्यात, मूळ मानधनात एकूण ३० टक्के मानधनवाढ करावी, महिन्याच्या पाच तारखेच्या आत मानधन मिळावे, सीएससी ई- गव्हर्नन्स संस्थेमार्फत प्राप्त होणाऱ्या मासिक मानधनाचा तपशील पाहता एकूण मूळ मानधनातून ग्रॅच्युईटी, ईएसआयसी, पीटी यांची मासिक रक्कम कपात केली जाते. यांच्या मासिक मूळ माधनातून पीएफ, ग्रॅच्युईटी, ईएसआयसीची कपात न करता ती नियमानुसार संबंधित संस्थेने अदा करावी, शासकीय भरतीमध्ये आरक्षित राखीव जागा उपलब्ध करून द्याव्यात आदी मागण्यांच्या समावेश आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->