दि. ०४.१२.२०२३
धान खरेदी करताना शेतकऱ्यांना योग्य सहकार्य करा; - आमदार डॉ. देवरावजी होळी
- रांगी, मोहली, सोडे, दुधमाळा व चातगाव येथे आमदार डॉ.देवराव जी होळी यांच्या हस्ते धान खरेदी केंद्राचे उद्घाटन.!
- शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याची दिले निर्देश.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यामध्ये धान खरेदी करताना नेट इंटरनेटचा येणारा कटू अनुभव लक्षात घेता शेतकऱ्यांना योग्य सहकार्य करून त्यांच्या नावाची नोंदणी करून धान खरेदी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे व त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असे निर्देश आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी धानोरा तालुक्यातील धान खरेदी केंद्रांचे उद्घाटन करताना केले.
आमदार डॉ. देवरावजी होळी यांचे हस्ते धानोरा तालुक्यातील रांगी, मोहोली, सोडे, दुधमाळा व चातगाव या सेंटरवरील धान खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी धानोरा तालुक्याच्या अध्यक्षा सौ.लताताई पुंगाटी, भाजपा नेते तथा कृ.उ. बाजार समितीचे सभापती शशिकांतजी साळवे, संचालक हेमंत बोरकुटे,एसआरएम सोनवणे, यांचे सह संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.