पोस्टर सादरीकरणात गोंडवाना विद्यापीठाने पटकावले तिसरे स्थान.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

पोस्टर सादरीकरणात गोंडवाना विद्यापीठाने पटकावले तिसरे स्थान.!

दि. १६ डिसेंबर २०२३
Vidarbha News India 
पोस्टर सादरीकरणात गोंडवाना विद्यापीठाने पटकावले तिसरे स्थान.!
विदर्भ न्यूज इंडिया 
गडचिरोली : रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात इन्स्टिट्यूशन्स, इनोव्हेशन कौन्सिलची प्रादेशिक बैठक नागपूर येथे नुकतीच पार पडली. पोस्टर प्रेझेंटेशन आणि युक्ती इनोव्हेशन प्रेझेंटेशन घेण्यात आले. 
त्यात पोस्टर सादरीकरणात गोंडवाना विद्यापीठाने तिसरे स्थान पटकावले.
गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक विभागाच्या गणित विभागातील विकास केशव आक्केवार, वाणिज्य विभागाचा जितेश देविदास बन्सोड यांनी तिसरा क्रमांक पटकावला.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन,विकासचंद्र रस्तोगी, सहाय्यक इनोव्हेशन संचालक, दीपेन साहू, एआयसीटीइ सल्लागार डॉ.राजेंद्र काकडे, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, संचालक,जी.एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर डॉ. सचिन उंटावळे उपस्थित होते.
अटल टिंकरिंग लॅब, युक्‍ती कार्यक्रम यासारख्या विविध योजनांची माहिती उपस्थितांनी दिली. जी विद्यार्थ्यांच्या उद्योजकीय विकासासाठी शिक्षण मंत्रालयामार्फत चालवली जातात. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गोंडवाना विद्यापीठातील इन्स्टिट्यूशन्स, इनोव्हेशन कौन्सिलच्या समन्वयक डॉ.प्रिया गेडाम आणि ट्रासेफ चे व्यवस्थापक विनय साळवे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या या यशासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे,कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान डॉ. अनिल चिताडे, अधिष्ठाता मानव विज्ञान विद्याशाखा डॉ. चंद्रमौली यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->