गडचिरोली जिल्ह्यातील समस्यांबाबत हिवाळी अधिवेशन कालावधीत बैठकीचे आयोजन.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

गडचिरोली जिल्ह्यातील समस्यांबाबत हिवाळी अधिवेशन कालावधीत बैठकीचे आयोजन.!

दि. ७ डिसेंबर २०२३ 
Vidarbha News India 
गडचिरोली जिल्ह्यातील समस्यांबाबत हिवाळी अधिवेशन कालावधीत बैठकीचे आयोजन.!
- आमदार डॉ. देवराव होळी यांच्या निवेदनावर मा. उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी दिली बैठकीची सुचना.! 
विदर्भ न्यूज इंडिया 
प्रतिनिधी/नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील समस्यांबाबत मागील अनेक दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू असून शासनाच्या निदर्शनास आणून दिलेले आहे. परंतु अजूनही त्यातील काही समस्या अजूनही मार्गी लागलेल्या नाहीत. त्यामुळे ज्वलंत असणाऱ्या या खालील समस्या मार्गी लावण्यासाठी नागपूर येथील या हिवाळी अधिवेशन कालावधीमध्ये बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी आमदार डॉ. देवराव होळी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली.
आमदार डॉ. देवराव होळी यांच्या सूचनेवरून ना. देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करीत या अधिवेशन कालावधीमध्ये बैठकीचे आयोजन करावे असे निर्देश दिले.
गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्न करीत असून त्या माध्यमातून अनेक समस्या मार्गी लावलेले आहेत परंतु आणखी काही ज्वलंत समस्या असून त्या सोडवण्याची आवश्यकता असल्याचे सांगत आमदार डॉ. देवराव होळी यांनी जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत देवेंद्र फडणवीस यांना अवगत केले. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील मंजूर असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरिता निधी उपलब्ध करून देऊन २०२४-२५ या सत्रात प्रवेश प्रक्रिया सुरू करणे, गडचिरोली येथील विमानतळाच्या जागेचे अधिग्रहण प्रक्रिया राबवून विमान सेवा सुरू करणे, गडचिरोली जिल्हा स्टेडियम बांधकामाच्या पहिल्या टप्प्यातील निविदा प्रक्रिया रद्द करणे व दुसऱ्या टप्प्यातील निविदा प्रक्रियेस मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देणे, चामोर्शी तालुक्यातील राजीव गांधी उपसा सिंचन योजना भेंडाळा व गडचिरोली तालुक्यातील वसा-पोर्ला उपसा सिंचन योजनेला मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देणे, गडचिरोली तालुक्यातील गोगाव उपसा सिंचन योजनेच्या पिडीएनद्वारे पाणीपुरवठा योजनेला मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देणे, वडसा ते गडचिरोली या मंजूर असलेल्या रेल्वे लाईनच्या कामाला गती देणे व गडचिरोली ते मंच्यारियल या नवीन रेल्वे लाईन मंजूर करणे, गडचिरोली शहरातील मुख्यालयाच्या ठिकाणी प्रशासकीय भावनाला मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देणे, गडचिरोली व चामोर्शी येथे तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय भवनाला मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देणे, गडचिरोली, चामोर्शी व धानोरा येथे पंचायत समितीच्या कार्यालयाच्या प्रशासकीय भवनाला मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देणे, गडचिरोली येथे शहराच्या ठिकाणी सांस्कृतिक सभागृहाला मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देणे, गडचिरोली जिल्ह्याच्या मुख्यालय नगर विकास भवन मंजूर करून निधी उपलब्ध करून देणे, गडचिरोली शहरातील वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावाला मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देणे,  गडचिरोली शहरातील वाढीव गटार लाईन योजनेच्या प्रस्तावाला मान्यता देऊन निधी उपलब्ध  करून देणे, २०११ पूर्वी पासून अतिक्रमण करून राहत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी, गैर आदिवासी व बंगाली बांधवांच्या घरांच्या व शेतीच्या जमिनी नियमित करून स्थायी पट्टे देणे, चामोर्शी तालुक्यातील रेगडी कन्नमवार जलाशयाचे मुख्य पाट दुरुस्ती करणे व रिपेरिंग करिता निधी उपलब्ध करून देणे, रेगडी कन्नमवार जलाशयातून रेगडी, चापलवाडा, आमगाव सह १४ गावांना शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी नवीन उपसा सिंचन योजनेला मान्यता देणे,आष्टी पेपर मिल द्वारे अधिग्रहित केलेल्या जागेला शासनाने ताब्यात घेऊन जमीन दुसऱ्या कंपनीला देणे व जमीन गेलेल्या शेतकऱ्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरी देणे, गडचिरोली जिल्ह्यात होत असलेल्या नरभक्षक वाघांच्या व  रानटी हत्तींच्या हल्ल्यात मृत्यू  झालेल्यांच्या परिवारातील एका सदस्याला शासकीय नोकरी देणे या समस्यांचा समावेश असून  त्या मार्गी लावण्यासाठी नागपूर येथील या हिवाळी अधिवेशनामध्ये बैठकीचे आयोजन  करुन गडचिरोली जिल्ह्याला न्याय द्यावा अशी विनंती केली.

Share News

copylock

Post Top Ad

-->