दि. 27.01.2024
अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची जिल्हा कृषि महोत्सव कार्यक्रमास भेट.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : दि.२६ जानेवारी २०२४ रोजी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान (उमेद), महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), आणि नाबार्ड यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत जिल्हा कृषि महोत्सव कार्यक्रमास धर्मरावबाबा आत्राम, मंत्री, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांनी भेट दिली. यावेळेस त्यांनी कृषि महोत्सव कार्यक्रमात आयोजीत विवीध दालनांस भेट देऊन स्टॉलधारकांकडुन माहिती जाणुन घेतली.
संजय मीणा, जिल्हाधिकारी, गडचिरोली, आयुषी सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.गडचिरोली, कुमार चिंता, अपर पोलिस अधिक्षक (प्रशासन),गडचिरोली, यतिश देशमुख, अपर पोलिस अधिक्षक (प्राणहिता),गडचिरोली, धनाजी पाटिल, अतिरीक्त जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी आज कृषि महोत्सवातील विवीध दालनांस भेट दिली. तसेच पंढरी डाखळे, प्रकल्प संचालक, आत्मा, गडचिरोली, बसवराज मास्तोळी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली, प्रशांत शिर्के, प्रकल्प संचालक, ग्रामीण विकास यंत्रणा, गडचिरोली, विष्णुपंत झाडे, जिल्हा समन्वयक, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), आबासाहेब धापते, प्रकल्प उपसंचालक, आत्मा, गडचिरोली, श्रीमती अर्चना राऊत, नोडल अधिकारी, स्मार्ट प्रकल्प, गडचिरोली, प्रफुल भोपये, जिल्हा अभियान व्यवस्थापक, उमेद, गडचिरोली हे उपस्थित होते.
डॉ.नितीन दुधे, पशुधन विकास अधिकारी, गडचिरोली यांनी रेबीज या रोगाविषयी व तो कसा टाळता येईल याविषयी मार्गदर्शन केले. श्रीमती प्रतिभाताई चौधरी , जिजामाता पुरस्कार प्राप्त महिला शेतकरी गडचिरोली यांनी कार्यक्रमास उपस्थित महिला शेतक-यांना मार्गदर्शन केले. डॉ.पवन पावडे, पशुधन विकास अधिकारी, पं.स. अहेरी यांनी मुक्त संचार गोठा व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. डॉ.प्रसाद भामरे, पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पं.स. कुरखेडा यांनी मुक्त संचार कोंबडी पालन याविषयी मार्गदर्शन केले. श्री. प्रशांत एरोजवार, व्यावसायीक, मॉं अनुसया डेअरी संस्था, कोटगल, ता.गडचिरोली यांनी आपल्या दुग्धव्यवसाय, दुग्ध संकलन, प्रक्रिया व विपनन विषयी आपले अनुभव व्यक्त केले. डॉ.यशवंत उमरदंड, पशुवैद्यकीय अधिकारी, अहेरी यांनी शेळीपालन विषयी मार्गदर्शन केले.
आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृनधान्य वर्ष २०२३ निमित्त पौष्टीक तृनधान्य पाककला स्पर्धा आयोजीत करण्यात आली. या स्पर्धेत १० पेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेऊन आपल्या पाककला प्रदर्शित केल्या. कृषि महोत्सवातील जैव प्रात्येक्षिके, दालने व कार्यशाळेस मोठ्या संखेने शेतकरी, महिला, विद्यार्थी व स्थानीक नागरीकांनी भेट दिली.
Food and Drug Administration, Minister DharmaRaoBaba Atram visited the District Agriculture Mahotsav program.