Gadchiroli : चामोर्शी येथे 28 जानेवारी ला समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

Gadchiroli : चामोर्शी येथे 28 जानेवारी ला समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन.!

दि. 27.01.2024
Vidarbha News India 
Gadchiroli : चामोर्शी येथे 28 जानेवारी ला समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन.! 
विदर्भ न्यूज इंडिया 
प्रतिनिधी/चामोर्शी : "समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना महाराष्ट्र राज्य" यांच्या वतीने तथागत गौतम बुद्ध, शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहु महाराज, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मा. कांशीराम साहेब यांच्या "जाती तोडो समाज जोडो" या स्वाभिमानी चळवळ व स्व: आत्मसन्मान जीवन जगण्याचा समाजबांधवांना प्राप्त होने हा मुलभूत अधिकार आहे. ही हजारो वर्षांपासून चाललेली लढाई आहे. पुर्वजांच्या इतिहासातुन धडा घेऊन, त्यांच्या विचारांने प्रेरित होऊन समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन मौजा चामोर्शी येथे करण्यात आले आहे. समाजातील सर्व बंधु/भगिनीनी "
दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12:00 वा. रोज रविवार ला मौजा चामोर्शी, जिल्हा गडचिरोली येथे मोठ्या संख्येने उपस्थित होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाला पुढील प्रमाणे समाजातील मान्यवर व मार्गदर्शक उपस्थित होणार आहेत. किशोर नगराळे मुख्याध्यापक, लक्ष्मण मोहुलें सामाजिक कार्यकर्ता, धम्मराव दुर्गमवार. सा. का., मुक्तेश्वर कोमलवार संवर्ग विकास अधिकारी, दिगंबर लाटेलवार साहेब ग्राम विस्तार अधिकारी, प्रभाकर इटकेलवार राऊंड ऑफिसर, काशिनाथ देवगडे, प्रभाकर वासेकर साहेब पोलीस उप निरीक्षक, राजेश कलगटवार सा. का., मा. बबन गोरंतवार, सा. का. मा. रुपेश वालकोंडे अध्यक्ष, विजय देवतळे, सुरेंद्र चनेकर, गजु अलेवार, विनोद बाचलवार, विनोद आसंपलीवार, किशोर नरुले, मायाताई मोहुर्ले, वर्षाताई लाटेलवार, मंदिप गोरडवार सा. का., प्रकाश घोगरे शिक्षक, पी. एस. आय. बोलीवार, विनोद लाटेलवार व्यवस्थापक SBI यांचे प्रमुख मार्गदर्शनात समाज प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व समाज बांधवांना भगिनींना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Gadchiroli: Organized community awareness program on January 28 in Chamorshi.
• आयोजक : 
सर्व समाज बांधव भगिनी, चामोर्शी वार्ड कमेटी, जिल्हा गडचिरोली.

Share News

copylock

Post Top Ad

-->