दि. 07.01.2024
गोंडवाना विद्यापीठात ‘गोंडी-माडिया शब्दकोश संकलन’ यावर सात दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात आदिवासी अध्यासन केंद्रातर्फे दि. ८ जानेवारी ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत गोंडी-माडिया शब्दसंग्रह आणि भाषा संहिताकरण या विषयावर सात दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. या कार्य शाळेचे उद्धाटन उद्या सकाळी ११.००वाजता होणार आहे. यामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील गोंडी-माडिया भाषेतील तज्ञ यांचे मार्गदर्शन व गोंडी-माडिया शब्दसंकलन यावर वैचारिक मंथन करून गोंडी-माडिया शब्दकोश निर्मिती च्या दृष्टीने हि कार्यशाळा महत्वाची भुमिका पार पाडील. राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये सूचीबद्ध केलेल्या अनेक अधिकृत भाषांपेक्षा गोंडीमध्ये अधिक भाषिक आहेत. अनेक लोक भाषा बोलत असूनही, गोंडी युनेस्कोच्या जागतिक भाषांच्या एटलस इन डेंजरमध्ये 'असुरक्षित' श्रेणीत आहे. सदर कार्यशाळा हि गोंडी-माडियाचे भाषेचे जतन आणि प्रमाणीकरण करण्याचा उपक्रम आहे. या कार्यशाळेत संकलित झालेले शब्दकोशाचे प्रसिद्धी आदिवासी अध्यासन केंद्र गोंडवाना विद्यापीठ करणार आहे.
या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे राहणार असून
प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.