सर्व ऐतिहासिक स्थळांवरील अतिक्रमण हटवण्यात येईल - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

सर्व ऐतिहासिक स्थळांवरील अतिक्रमण हटवण्यात येईल - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दि. 07 जानेवारी 2024

Vidarbha News India 

सर्व ऐतिहासिक स्थळांवरील अतिक्रमण हटवण्यात येईल - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विदर्भ न्यूज इंडिया 

नागपूर : राज्यात ज्या काही ऐतिहासिक व धार्मिक स्थळांवर अतिक्रमण झाले असेल ते टप्प्या टप्प्याने हटवण्यातच येईल, असे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपूरमध्ये सांगितले.

फडणवीस शनिवारी नागपूरमध्ये होते. ते गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहेत. येथील विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या नियोजन समितीची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पन्हाळगडाला लागून असलेल्या पावनगडावरील अतिक्रमण हटवण्यात आले आहे. यासंदर्भात फडणवीस यांना विचारणा केली असता ते म्हणाले, राज्यातील ज्या ऐतिहासिक किंवा धार्मिक ठिकाणी अतिक्रमण झाले असेल त्या सर्व ठिकाणांवरील अतिक्रमण टप्प्या टप्प्याने हटवण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल आहे. तेथे शासनाच्यावतीने विविध उद्योग सुरू करण्यात आले आहे. हा जिल्हा आता औद्यगिक हब होऊ पाहतो आहे. हे लक्षात घेऊन या जिल्ह्यासाठी राज्य शासनाकडून जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न केला जाईल. गडचिरोली जिल्ह्यात विमानतळ सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्या ठिकाणी सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. लवकरच भूसंपादनाचे काम हाती घेतले जाईल. या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयही सुरू करण्यात येणार आहे. तेथे जून २०२४ पासून प्रवेश कसे सुरू करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वनविभागाच्या जमिनीच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली व ते सोडवण्यात आले तसेच वीज खात्याच्या प्रश्नांवरही चर्चा झाली. मागील वर्षाचा जिल्ह्याचा ९९ टक्के निधी खर्च झाला आहे. चालू वर्षाचाही ६० टक्के खर्च झाला आहे. उर्वरित खर्च पुढच्या टक्क्यात होणार आहे. पुढील वर्षासाठी गडचिरोली जिल्ह्याला ५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अधिक निधी या जिल्ह्याच्या विकासासाठी देण्याचा प्रयत्न राहील. कोंडसरी प्रकल्पाचा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार असून त्याच वेळी २० हजार कोटीच्या दुसऱ्या प्रकल्पाचेही भूमिपूजन केले जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. 

Share News

copylock

Post Top Ad

-->