दि. 10 जानेवारी 2024
सोमनपल्ली येथे माजी मुख्यमंत्री कन्नमवार यांच्या स्मारकाचे आमदार डॉ. देवराव होळी यांचे हस्ते अनावरण.!
- बेलदार समाज संघटना सोमनपली यांच्या सौजन्याने सोमनपल्ली येथे माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांची १२४ वी जयंती उत्साहात साजरी.!
- यानिमित्त १० लक्ष रुपयाच्या बेलदार समाजभवनाचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले भूमिपूजन.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : महाराष्ट्र राज्याचे लाडके दुसरे मुख्यमंत्री, थोर स्वातंत्र्य सेनानी, रेगडी कन्नमवार जलाशयाचे निर्माते स्वर्गीय दादासाहेब उर्फ मा. सा.कर्मवीर कन्नमवार यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त सोमनपल्ली येथे स्मारक अनावरण व भवन भूमिपूजन सोहळा आमदार डॉ. देवराव होळी यांच्या शुभ हस्ते पार पडला.
बेलदार समाज संघटना सोमनपली यांच्या सौजन्याने सोमनपल्ली येथे माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांची १२४ वी जयंती स्मारक अनावरण व भवन भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार डॉ. देवराव होळी पूर्णवेळ उपस्थित होते.
आमदार डॉ. देवराव होळी यांनी बोलल्याप्रमाणे बेलदार समाज भवनसाठी १० लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करून दिली व त्या समाजभावनाचे भूमिपूजनही या जयंतीच्या निमित्ताने केले. याप्रसंगी विदर्भ बेलदार समाज संघटनेचे चंद्रशेखर कोटेवार, राजूभाऊ कात्रटवार, आनंदरावजी अंगलवार, सरपंच नीलकंठ पाटील निखाडे भाजपाचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, दिलीप चलाख भाजपा जिल्हा सचिव सौ बांबोडे मॅडम, नारायणजी पल्लेवार, पुल्लयाजी प्रिसिंगलवार श्री सुरेश पवार, प्रामुख्याने उपस्थित होते.