Maharashtra politics : 'तुम्ही दिलेला निकाल जनतेसमोर येऊन सांगा' - संजय राऊत - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

Maharashtra politics : 'तुम्ही दिलेला निकाल जनतेसमोर येऊन सांगा' - संजय राऊत

दि. 17.01.2024

Vidarbha News India

Maharashtra politics : 'तुम्ही दिलेला निकाल जनतेसमोर येऊन सांगा' - संजय राऊत 

Marathi News Live Update :

विदर्भ न्यूज इंडिया 

मुंबई : अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या सोहळ्यात रामलल्लाच्या मुर्तीचे आज नव्या मंदिर परिसरात आगमन होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या स्त्री संवाद यात्रेला आजपासून विदर्भात सुरुवात होत आहे.

तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय कृष्णा कृषी महोत्सवाचे उद्घाटन होणार होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावर पहिल्याच दिवशी 70 हजार कोटींचे सामंजस्य करार झाला आहे. यासह महाराष्ट्राच्या राजकारणातील इतर बातम्यासांठी मुंबई तक लाईव्ह ब्लॉग नक्की वाचा.

आताची शिवसेना ही पाकीट मारी

ते सुद्धा कमळाच्या चिन्हावर लढणार आहेत असा मी ऐकत आहे .मुळात ती शिवसेना नाही आहे हा ओढून ताणून केलेला प्रकार आहे, ही शिवसेना कशी असू शकते. शिवसेना इकडे आहे आम्ही 23 जागा लढत आहे. या आधी सुद्धा लढत आहे आणि त्याच्यानंतर ही लढू ही खरी शिवसेना आहे.आताची शिवसेना ही पाकीट मारी आहे.दुसऱ्याचे पाकीट मारायचं आणि आपल्या खिशात ठेवायचा तशी शिवसेना फार काळ टिकणार नाही, असा टोला राऊतांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला.

तुम्ही दिलेला निकाल जनतेसमोर येऊन सांगा

जनता न्यायालयात जे पुरावे दाखवत होतो ते बिनकाचेचा गॉगल लावून पाहत होतात का असा हल्ला संजय राऊतांनी विधानसभा अध्यक्षांनी राहुल नार्वेकर यांना केला. जनता न्यायालयातून आम्ही भक्कम पुरावे समोर आणले. तुम्ही कसे खोट बोलला आहात, तुम्ही कसा खोटारडेपणाने निकाल दिला आहे. निकाल दबावाखाली दिला असेल किंवा तुमची मत भ्रष्ट झाली असेल, त्याच्यावर आम्हाला काही देणे घेण नाही. तुम्ही दिलेला निकाल जनतेसमोर येऊन सांगा, हे आव्हान स्विकारा, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष आहेत. पण अजून त्या आपल्या भूमिकेत शिरले नाहीत. अजूनही ते रोज पक्षांतर करणारा कार्यकर्ता याच भूमिकेत आहेत म्हणून ते त्याच भूमिकेत आहेत. दसरा मेळावा हा जनता मेळावाच आहे. तुम्ही देखील हजर राहिला होतात. जनतेसमोर या निवडणूक होऊ द्या, तुमची सत्ता जाईल, तुम्हाला जनता रस्त्यावर फिरणे अवघड होईल. तुमच्या निकालाने साडेअकरा कोटी महाराष्ट्राच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसले आहे,अशी टाका देखील संजय राऊतांनी केली.

ठाकरेंनंतर मनसे जाणार जनता न्यायालय

महाराष्ट्र सैनिकांवर आंदोलनाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. कोर्टात तुम्हाला वर्षानुवर्ष केसेस लढाव्या लागतात. न्याय मिळेल की नाही याची अपेक्षा नसते. त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांनी त्यांच्या त्यांच्या शाखेत एक एक जनता न्यायालय बसवावं आणि या न्यायालयात आपल्यावरी केसेस चालवून आपली निर्दोष सुटका करून घ्यावी. गरज भासल्यास वकीलांनाही बोलवावे,असे मनसे नेते संदिप देशपांडे यांनी सांगितले आहे.

फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंच्या रणरागिणी करणार शक्तिप्रदर्शन

शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून रश्मी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री संवाद यात्रा काढणार आहेत. या यात्रेची सुरुवात विदर्भात झाली असून ती बुधवारी नागपूर जिल्ह्यात दाखल होत आहे. जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघात ही यात्रा फिरणार असून महिलांशी संवाद साधणार आहे. रामटेक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येथील शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने हे शिंदे गटासोबत आहेत. त्यामुळे ही जागा उद्धव ठाकरे गटांसाठी महत्वाची आहे.


Share News

copylock

Post Top Ad

-->