दि.13 जानेवारी 2024
Vidarbha News India
उद्या 14 जानेवारीला महायुतीचा जिल्हास्तरीय महामेळावा.!
Mahayuti Melava : Gadchiroli
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : नुकताच महाराष्ट्र राज्यात भारतीय जनता पार्टीसोबत 11 घटक पक्षाने हात मिळवणी केली आहे. त्यामुळे आता 12 घटक पक्ष एकत्र येऊन महायुती स्थापन झाली आहे. आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन या महायुतीने उद्या, 14 जानेवारी रोजी रविवारला राज्यात एकाच दिवशी जिल्हास्तरीय महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
याच पृष्टभूमिवर गडचिरोलीतही उद्या, दि.14 जानेवारीला रविवारी दुपारी 12 वाजता गडचिरोली येथील धानोरा मार्गावरील महाराजा लॉनमध्ये जिल्हास्तरीय महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महायुतीच्या पदाधिकार्यांनी येथील सर्किट हॉऊस येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली.
संकल्प महाविजय-2024 Mahayuti Melava महायुतीच्या प्रदेश नेतृत्वाच्या सुचनेनुसार व प्रदेश स्तरावरील ठरल्याप्रमाणे गडचिरोली येथे 14 जानेवारीला होणार्या जिल्हास्तरावरीय महामेळाव्याकरीता महायुतीची पत्रकार परिषद घेण्यात आली. या मेळाव्यातून महायुतीच्या पुढील वाटचालीबाबत जनतेला माहिती देण्यात येणार आहे. महायुतीच्या सर्व घटक पक्षाने एकत्र येऊन महायुती मिळून आगामी निवडणूका लढविणार असल्याचेही यावेळी महायुतीच्या पदाधिकार्यांनी सांगीतले.
पत्रकार परिषदेला खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, भाजपा लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, शिवसेना संपर्क प्रमुख हेमंत जंम्बेवार, आर. पी. आय. गटाचे मुनिश्वर बोरकर, आर. पी. आय (आठवले) गटाचे घुटके, किसान आघाडी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रमेश भुरसे, Mahayuti Melava भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री योगीता पिपरे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा गिता हिंगे, अमीता मडावी, निताताई वडेट्टीवार, यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.