दि.14.01.2024
Vidarbha News India
महायुती आज फोडणार प्रचाराचा नारळ, राज्यभरात एकाच दिवशी 'महामेळावे'; 'या' 25 मंत्र्यांसह 52 प्रमुख नेत्यांवर जबाबदारी.!
विदर्भ न्यूज इंडिया
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) अनुषंगाने महायुती कामाला लागली असून, आज राज्यभरात सर्वच जिल्ह्यात महायुतीचे मेळावे (Mahayuti Meeting) आयोजित करण्यात आले आहेत.
कोणत्या नेत्यावर कुठली जबाबदारी...
- नागपूर : श्रीमती चित्रा वाघ (भाजप महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा), जयदीप कवाडे (रिपब्लिकन पक्ष कवाडे गट)
- छत्रपती संभाजीनगर : संदिपान भुमरे (कॅबिनेटमंत्री)
- गडचिरोली : सुबोध मोहिते (माजी केंद्रीयमंत्री)
- अहमदनगर : राधाकृष्ण विखे-पाटील (कॅबिनेटमंत्री)
- अकोला : प्रवीण दरेकर (गटनेते भाजप, विधान परिषद)
- सोलापूर : चंद्रकांत पाटील (कॅबिनेटमंत्री)
- अमरावती : बच्चू कडू (माजी मंत्री), अनिल बोंडे (खासदार), रवी राणा (आमदार)
- पुणे : रामराजे नाईक-निंबाळकर (माजी सभापती, विधान परिषद), आमदार प्रसाद लाड (समन्वयक महायुती)
- भंडारा : विजयकुमार गावित (कॅबिनेटमंत्री)
- धुळे : गिरीश महाजन (कॅबिनेटमंत्री)
- लातूर : संभाजी निलंगेकर-पाटील (माजी मंत्री)
- धाराशिव : तानाजी सावंत (कॅबिनेटमंत्री)
- परभणी : संजय बनसोडे (कॅबिनेटमंत्री)
- पालघर : रवींद्र चव्हाण (कॅबिनेटमंत्री), हितेंद्र ठाकूर (अध्यक्ष- बहुजन विकास आघाडी)
- सिंधुदुर्ग : आदिती तटकरे (कॅबिनेटमंत्री)
- हिंगोली : अब्दुल सत्तार (कॅबिनेटमंत्री)
- मुंबई : दीपक केसरकर (कॅबिनेटमंत्री), आशिष शेलार (अध्यक्ष, मुंबई भाजप), राहुल शेवाळे (खासदार, शिंदे गट), अविनाश महातेकर (माजी मंत्री,
- रिपाइं आठवले गट), सचिन खरात (रिपाइं खरात गट), सिद्धार्थ कासारे (रिपाइं आठवले गट)
- कोल्हापूर : हसन मुश्रीफ (कॅबिनेटमंत्री)
- बीड : धनंजय मुंडे (कॅबिनेटमंत्री), तानाजीराव शिंदे (शिवसंग्राम)
- सातारा : शंभूराज देसाई (कॅबिनेटमंत्री)
- ठाणे : श्रीकांत शिंदे (खासदार)
- मुंबई उपनगर : आशिष शेलार (अध्यक्ष, मुंबई भाजप), छगन भुजबळ (कॅबिनेटमंत्री), गजानन कीर्तीकर (खासदार), रामदास कदम (माजी मंत्री)
- गोंदिया : धर्मरावबाबा अत्राम (कॅबिनेटमंत्री)
- नंदुरबार : अनिल भाईदास पाटील (कॅबिनेटमंत्री)
- वर्धा : दीपक सावंत (माजी मंत्री)
- चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार (कॅबिनेटमंत्री)
- जालना : अतुल सावे (कॅबिनेटमंत्री)
पालघर जिल्ह्यात महायुतीचा मेळावा...
आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा मेळाव्याचे आज राज्यभरात आयोजन करण्यात आले असून, पालघर जिल्ह्यात देखील संध्याकाळी 4 वाजता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहेत. या मेळाव्याला महायुतीतील काही वरिष्ठ नेते आणि निरीक्षक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या उमेदवारीसाठी या मेळाव्यात उहापोह होण्याची शक्यता असून, शिवसेनेचे राजेंद्र गावित सध्या पालघरचे खासदार आहेत. श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी उमेदवार गावितच असतील आणि चिन्ह धनुष्यबाणच असेल असं कार्यकर्ता मेळाव्यात सांगितलं आहे. तर, भाजपची या निर्णयाला पूर्ण नापसंती दिसून येत असून, नारायण राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या डहाणूमधील उमेदवार कमळावरच लढवावा अशा घोषणा ऐकायला मिळाल्या. भाजपची गाविताना नापसंती दिसून आली असून, दुसरीकडे बहुजन विकास आघाडी ही महायुतीत सामील झाल्याचे म्हटले जाते. प्रत्येक निवडणुकीत महविकास आघाडीकडून बविआ आपला उमेदवार उभा करत होते. त्यामुळे त्यांचा निर्णय काय असेल तेही पाहणं महत्वाचं ठरेल. पालघर लोकसभेच्या आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या जागेसाठी आज होणाऱ्या महायुती मेळाव्यात खडाजंगी होते की, कार्यकर्त्यांचे मनोमीलन हे पाहणं महत्वाचे असणार आहे.