नायलॉन मांजा वापरल्यास थेट जेलची हवा! पोलिसांकडून ४६ जण ताब्यात, लाखोंचा मांजा जप्त, धडक कारवाई.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

नायलॉन मांजा वापरल्यास थेट जेलची हवा! पोलिसांकडून ४६ जण ताब्यात, लाखोंचा मांजा जप्त, धडक कारवाई.!

दि. 14.01.2024

Vidarbha News India 

Nylon Manja Sellers : नायलॉन मांजा वापरल्यास थेट जेलची हवा! पोलिसांकडून ४६ जण ताब्यात, लाखोंचा मांजा जप्त, धडक कारवाई.!

Police Arrested Nylon Manja Sellers:

विदर्भ न्यूज इंडिया 

नागपूर : नागपुर शहरात मकरसंक्रातीनिमित्ताने पतंगोत्सव साजरा करण्यात येतो. मात्र, गेल्या काही वर्षात नायलॉन मांजामुळे अपघात होऊन काहींना जीवही गमवावा लागला.

यामुळे पोलिस कारवाईचा धडाका कायम असून यंदा नायलॉन मांजा वापरताना दिसल्यास थेट जेलची हवा खावी लागणार आहे. गेल्या काही दिवसात पोलिसांनी लाखोंचा मांजा जप्त केला असून ४६ जणांवर गुन्हे दाखल करीत ताब्यात घेतले. यामुळे कारवाईचा फास आवळताना दिसत आहे.

गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पोलिसांनी नायलॉन मांजाविरोधात अभियान राबवत आहे. आतापर्यंत ३६ ठिकाणी छापे टाकून ९ लाख रुपयांचा मांजा जप्त केला. विशेष म्हणजे, यामध्ये पोलिसांनी ४६ जणांवर गुन्हे दाखल करीत, त्यांना ताब्यात घेतले. आता दोन दिवसांमध्ये कुठेही मांजासह नायलॉन मांजासह नागरिक आढळल्यास पोलिसांकडून त्याला थेट पोलिस कोठडीमध्येच ठेवण्याची तंबी देण्यात आली आहे. गुन्हे शाखा आणि पोलिस ठाण्याद्वारे कारवाईत पंधरा हजारांच्या मांजासह चार जणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट पाचद्वारे कोराडी पोलिस हद्दीतील मच्छी मार्केट परिसरात नायलॉन मांजा घेऊन जाणाऱ्या सुजल रमेश बोकडे (वय १९, रा. वार्ड नं. ०१, पाटणसावंगी, ता. सावनेर) याला ताब्यात घेत, मोनोकाईटचा ३ चकऱ्या जप्त केल्या. तहसील पोलिस ठण्याच्या हद्दीत भावसार चौकात पोलिसांनी सापळा रचून रियाज शेख वल्द शेखजी शेख (वय ३४,, रा. कब्रस्थान, दुसरी लाईन, हसनबाग) याच्याकडून नायलॉन मांजाच्या ८ चकऱ्या जप्त केल्या.

भरतवाडा ते सर्जा बारकडे जाणारे मार्गावर सापळा रचून छापा टाकून निरज गोटू किशोर बोरकर (वय २३, रा. आनंद नगर, बिनाकी मंगळवारी)याच्याकडून ६ चकऱ्या जप्त केल्या. याशिवाय विजयनगरातील धनलक्ष्मी सोसायटी येथे राहणारा भुवनेश्‍वर गावकरण शाहू (वय ३४) याच्या घरावर छापा टाकून सहा चकऱ्या ६ चकऱ्या जप्त केल्या.

'से नो नायलॉन मांजा' अभियान
शासनाने प्रतिबंधित केलेल्या नायलॉन मांजामुळे पशू, पक्षी व नागरिकांना दुखापत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नायलॉन मांज्याची खरेदी-विक्री तथा वापर करू नका, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नायलॉन मांजाची खरेदी केल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार असून माहिती मिळाल्यास नियंत्रण कक्षाला कळविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. याबाबत चित्रपटगृह आणि सोशल मीडियावरही व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.

शहरात कुठल्याही परिस्थितीत नायलॉन मांजा वापरू नये यासाठी पोलिस कसोशीने प्रयत्न करीत आहेत. पोलिस आयुक्तांनीही त्याबाबत आवाहन केले आहे. नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर टाळावा आणि कुठेही त्याचा वापर होत असल्यास पोलिसांना कळवा.

- अर्चित चांडक, पोलिस उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा आणि
सायबर सेल, नागपूर, शहर पोलिस 

Share News

copylock

Post Top Ad

-->