राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत जानेवारीतील अन्नधान्य वाटपाबाबत सूचना.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत जानेवारीतील अन्नधान्य वाटपाबाबत सूचना.!

दि. 25.01.2024
Vidarbha News India 
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत जानेवारीतील अन्नधान्य वाटपाबाबत सूचना.!
विदर्भ न्यूज इंडिया 
गडचिरोली : सर्व रेशन कार्डधारकांना सुचित करण्यात येते की, गडचिरोली जिल्हयातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत माहे जानेवारी, 2024 या महिन्याकरीता अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील पात्र लाभार्थ्यांना गहू, तांदूळ व शिधासंच यांचे नियतन व वाटप परिमाण खालील प्रमाणे निश्चित केले आहे.
अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रती शिधापत्रिका 25 किलो तांदुळ रुपये ३ प्रति किलो प्रमाणे, गहू 10 किलो 2 रुपये प्रति किलो प्रमाणे, तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना प्रती व्यक्ती 3 किलो तांदुळ 3 रुपये प्रति किलो प्रमाणे, 2 किलो गहू 2 रुपये प्रति किलो प्रमाणे.  शिधाजिन्नस संच प्रतिसंच रुपये 100/- आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम ,2013 अंतर्गत दिनांक 01 जानेवारी, 2024 ते 31.12.2024 पर्यंत एक वर्षाच्या कालावधीकरीता पात्र लाभार्थ्यांना रु.3/- प्रतिकिलो तांदूळ, रु.2/- प्रतिकिलो गहू या दराने अनुज्ञेय असलेले अन्नधान्य पात्र लाभार्थ्यांना "मोफत" वितरीत करावयाचे शासन निर्देश प्राप्त आहे.
तसेच शासन पत्र दिनांक 16.01.2024 अन्वये जिल्हयातील रास्तभाव दुकानामर्फतीने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्नयोजनेतील व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना अगामी श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळयानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त 6 शिधान्निस "आनंदाचा शिधा" प्रतिशिधापत्रिका 1 शिधासंच (1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो या परिमाणात रवा, चनाडाळ, मैदा व पोहे) या 6 शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधाजिन्नसंचाचे माहे जानेवारी,2024 या महिन्याकरीता ई पॉस प्रणालीव्दारे रु.100/- प्रतिसंच या सवलतीच्या दराने वाटप करण्यात येत आहे.
तरी सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना सुचित करण्यात येते की, त्यांना नेमून दिलेल्या रास्तभाव धान्यदुकानात जावून आपले शिधापत्रिकेवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील माहे जानेवारी, 2024 या महिन्यातील नियमित देय असलेल्या धान्याची (गहू, व तांदूळ) मोफत उचल करावी. व धान्य घेतेवेळी POS मशीन मधून निघणारी पावती रास्तभाव दुकानदाराकडून घ्यावी व सोबतच नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रतिशिधापत्रिका 1 "आनंदाचा शिधा" रु.100/- प्रतिसंच ची उचल करावी.  दुकानांत एकाच वेळी गर्दी न करता सामाजिक अंतराचे पालन करावे.  असे जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->