गडचिरोली पोलीस दलातील मृत जवानांच्या कुटूंबियांना अ‍ॅक्सिस बँकेने दिला मदतीचा हात - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

गडचिरोली पोलीस दलातील मृत जवानांच्या कुटूंबियांना अ‍ॅक्सिस बँकेने दिला मदतीचा हात

दि. 24.01.2024 

Vidarbha News India 
गडचिरोली पोलीस दलातील मृत जवानांच्या कुटूंबियांना अ‍ॅक्सिस बँकेने दिला मदतीचा हात
विदर्भ न्यूज इंडिया 
गडचिरोली : पोलीस उपमहानिरिक्षक सा. व  मा. पोलीस अधीक्षक  सा. यांचे हस्ते दोन कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयाचा धनादेश स्वाधीन.
बॅंक म्हणजे ग्राहकांचे पैसे सांभाळणारी किंवा त्यांना कर्ज देणारी यंत्रणा अशी नागरीकांमध्ये ओळख असुन एक पाऊल पुढे जात आपल्या खातेधारकांच्या जिवाला धोका निर्माण झाला तर त्यांच्या कुटुंबियांना आर्थीक आधार देण्याचा नवा आदर्श अ‍ॅक्सिस बँकेने ठेवला आहे. दिनांक 28/06/2023 रोजी गडचिरोली पोलीस दलातील कार्यरत कर्मचारी अब्दुल वाहीद अब्दुल हमीद शेख यांचे दिर्घ आजाराने निधन झाले होेते त्यामुळे त्यांच्या कुटुंबियावर मोठे संकट कोसळले. ही समस्या ओळखुन अक्सिस बँकेने मदतीचा हात पुढे करीत त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती शगुफ्ता अब्दुल वाहीद शेख यांना आर्थीक मदत स्वरुपात मा. श्री. संदिप पाटील सा. पोलीस उपमहानिरिक्षक परिक्षेत्र गडचिरोली (कॅम्प नागपुर) यांचे हस्ते आज दि. 24 जानेवारी 2024 रोजी 10 लाख रुपयाचा धनादेश अदा करण्यात आला.
तसेच यापुर्वी दिनांक 01 जुलै 2023 रोजी गडचिरोली पोलीस दलातील कार्यरत कर्मचारी रोशन हरी राऊत यांचे कॅन्सर या आजाराने निधन झाले होेते. त्यांना देखील अ‍ॅक्सिस बॅकेच्या मदतीने रोशन हरी राऊत याच्या पत्नी श्रीमती ऊषा हरी राऊत यांना दि. 12 जानेवारी 2024 रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांचे हस्ते 10 लाख रुपयाचा धनादेश अदा करण्यात आला होता.
यावेळी मा. पोलीस उपमहानिरिक्षक परिक्षेत्र गडचिरोली (कॅम्प नागपुर) श्री. संदिप पाटील सा., मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा. तसेच अ‍ॅक्सिस बँकेचे शाखा व्यवस्थापक, श्री. राकेश राजेंद्र वल्लालवार व उप-शाखा व्यवस्थापक श्री. मुर्लीधर नैताम यांचे उपस्थितीत मृत कर्मचा-यांच्या कुटुंबियांना धनादेश स्वाधीन करण्यात आला.

Share News

copylock

Post Top Ad

-->