दि. 24.01.2024
अखेर वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात; खासदार अशोक नेते यांनी केली पाहणी
Wadsa-Gadchiroli Railway :
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : वडसा-गडचिरोली या 52 किलोमीटरच्या नवीन रेल्वे मार्गाच्या उभारणीचे कामाला अखेर सुरुवात झाली असून सदर वेगाने करण्यात येत आहे. खासदार अशोक नेते यांनी या कामाला आज बुधवारी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी रेल्वेच्या अभियंत्यांनी त्यांना झालेल्या कामाची माहिती दिली.
वडसा ते आरमोरी यादरम्यान वन्यजीवांची वर्दळ राहत असल्यामुळे या Wadsa-Gadchiroli Railway मार्गावर रेल्वेसाठी पुलाची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाची किंमत 1096 कोटी वरून 1888 कोटी रुपये झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रत्येकी 50 टक्के वाट्यातून उभारल्या जात असलेल्या या रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्प्यात 322 कोटी रुपयांच्या खर्चातून उभारल्या जाणार्या 20 किमीच्या रेल्वेमार्गाच्या कामाला सुरुवात झाली. वडसा रेल्वे स्थानकापासून गडचिरोलीच्या दिशेने या कामाची सुरुवात करण्यात आली.
गडचिरोली जिल्हा हा आदिवासी आकांक्षीत अविकसित जिल्हा म्हणून ओळख आहे. या जिल्ह्यात एकमेव वडसा (देसाईगंज) रेल्वे स्टेशन आहे. मात्र वडसा-गडचिरोलीपर्यंत 52 किलोमीटर पर्यंत रेल्वे मार्ग आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच Wadsa-Gadchiroli Railway विदर्भाच्या विकासासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात अग्रेसर असलेले विकास पुरूष केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही मोलाची भूमिका आहे. त्यामुळे या सर्वांचे खासदार नेते यांनी आभार आनले आहे.
खासदार अशोक नेते यांनी या कामाची गती पाहून समाधान व्यक्त केले. या Wadsa-Gadchiroli Railway कामासाठी आवश्यक असलेला निधी केंद्र आणि राज्य सरकारकडून वेळोवेळी मिळवून देण्यासाठी मी कटीबद्ध आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन गडचिरोली आणि पुढे छत्तीसगड, तेलंगणापर्यंत या रेल्वे मार्गाचा विस्तार केला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Finally the work of Vadsa-Gadchiroli railway line started; MP Ashok Nete inspected