गडचिरोली पोलीस दल प्रोजेक्ट उडान अंतर्गत “भव्य रोजगार मेळाव्याचे” आयोजन.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

गडचिरोली पोलीस दल प्रोजेक्ट उडान अंतर्गत “भव्य रोजगार मेळाव्याचे” आयोजन.!

दि. 18.01.2024
Vidarbha News India 
गडचिरोली पोलीस दल प्रोजेक्ट उडान अंतर्गत  “भव्य रोजगार मेळाव्याचे” आयोजन.! 
- 110 युवक-युवतींना मिळाला नवीन रोजगार.!
विदर्भ न्यूज इंडिया 
गडचिरोली : गडचिरोली जिल्हयातील गरजु युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन प्रोजेक्ट उडाण अंतर्गत मा. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल सा. यांचे मार्गदर्शनाखाली नागरी कृती शाखेच्या वतीने गडचिरोली जिल्ह्रातील बेरोजगार युवक-युवतींकरीता गडचिरोली पोलीस दल, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, राळेगाव आणि पार्कसन्स इन्स्टीट्युट, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 18/01/2024 रोजी  “भव्य रोजगार मेळाव्याचे” आयोजन पोलीस मुख्यायल परिसरातील एकलव्य हॉल येथे करण्यात आले. 
या रोजगार मेळाव्यात दुर्गम-अतिदुर्गम भागातील विविध प्रकारच्या स्वयंरोजगार प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी 100 ते 150 बेरोजगार उमेदवार सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित उमेदवारांमधुन, प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन राळेगाव यांचे मार्फत हॉटेल मॅनेजमेंट- 26, आटोमोबाईल- 30, इलेक्ट्रीशिअन- 35 व पार्कसन्स इन्स्टीट्युट, नागपूर यांचे मार्फत जनरल ड्युटी असीस्टंट करीता 19 अशा एकुण 110 उमेदवारांची निवड प्रशिक्षणाकरीता करण्यात आली.  प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आले. विविध प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या उमेदवारांचे मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. यांनी कौतुक केले असून, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मार्गदर्शन करतांना मा. अपर पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, गडचिरोली जिल्हयातील युवक-युवतींना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव तत्पर असून, नेहमी तुमच्या पाठीशी राहील, आपले मित्र व आप्तस्वकीय यांना देखील रोजगाराच्या बाबतीत अवगत करून त्यांनी देखील गडचिरोली पोलीस दलाने उपलब्ध करून दिलेल्या रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा व आपल्या कुटूंबियांचे राहणीमान उंचवावे. 
आतापर्यंत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडुन रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याद्वारे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन सुरक्षा रक्षक 601, नर्सिंग असिस्टंट 1262, हॉस्पीटॅलीटी 387, ऑटोमोबाईल 331, इलेक्ट्रीशिअन 233, प्लंम्बींग 35, वेल्डींग 38, जनरल डयुटी असिस्टंट 384, फील्ड ऑफीसर 11 व व्हीएलई  52, सेल्समॅन 4 असे एकुण 3338 युवक/युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापुर, गडचिरोली व बीओआय आरसेटी गडचिरोली यांचे मार्फत ब्युटीपार्लर 239, मत्स्यपालन 147, कुक्कुटपालन 585, बदक पालन 100, वराहपालन 10, शेळीपालन 177, शिवणकला 277, मधुमक्षिका पालन 63, फोटोग्राफी 100, भाजीपाला लागवड 1802, पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण 1212, टु व्हिलर दुरुस्ती 159, फास्ट फुड 170, पापड लोणचे 94, टु/फोर व्हिलर प्रशिक्षण 700, एमएससीआयटी 231, कराटे प्रशिक्षण 48, ज्युट प्रोडक्ट 35, केक 35 व सॉफ्ट टॉईज प्रशिक्षण 70 असे एकुण 6254 युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे. 
सदर रोजगार मेळावा कार्यक्रमास मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांच्या मार्गदर्शनाखाली मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री कुमार चिंता सा. तसेच पार्कसन्स इन्स्टीट्युट नागपूरचे मोबलायझेशन अँड प्लेसमेंट हेड श्री. हेमंत बन्सोड व टेलीकॉलींग अँन्ड मोबलायझर गडचिरोली कु. छकुली पोरेटी, प्रथम एज्युकेशन फाऊडेशनचे सेंटर हेड श्री. आशिष इंगळे व क्लस्टर हेड श्रीमती. भारती प्रजापती मॅडम हे उपस्थित होते. 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व उपविभागीय अधिकारी सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. धनंजय पाटील, पोउपनि. भारत निकाळजे, पोउपनि. चंद्रकांत शेळके व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

Share News

copylock

Post Top Ad

-->