गडचिरोली : वैनगंगा नदीत नाव बुडाली, एकाचा मृत्यू.! पाच बेपत्ता, एक महिला.. वाचा बातमी... - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

गडचिरोली : वैनगंगा नदीत नाव बुडाली, एकाचा मृत्यू.! पाच बेपत्ता, एक महिला.. वाचा बातमी...

दि. 23.01.2024

Vidarbha News India 

गडचिरोली : वैनगंगा नदीत नाव बुडाली, एकाचा मृत्यू.! पाच बेपत्ता, एक महिला.. वाचा बातमी...

- एका महिलेचे प्रेत मिळाले, पाच जणी बेपत्ता.! एक महिला बचावली.

विदर्भ न्यूज इंडिया 
प्रतिनिधी / गडचिरोली : वैनगंगा नदीच्या गणपूर (रै.) घाटावरून निघालेली नाव पाण्यात बुडाल्याने ६ महिला वाहून गेल्याची घटना आज दि. २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली आहे. 

या घटनेत एका महिलेचे प्रेत मिळालेले असून अद्याप ५ महिला बेपत्ता आहेत तर एका महिलेला वाचविण्यात आले आहे. या घटनेत गणपूर (रै.) येथील पोलीस पाटलाची पत्नीसुध्दा वाहून गेल्याची माहिती प्राप्त होत आहे.

सदर महिला मिरची तोडण्याकरीता चंद्रपूर जिल्ह्यात नावेच्या सहाय्याने जात होत्या. अचानक पाण्यात नाव वाहून गेल्यामुळे ७ महिला आणि नावाडी बुडाले.

नावाडी पोहून बाहेर निघून गेले व एका महिलेला वाचविण्यात आले. परंतु ६ महिला बुडाल्या. यापैकी एका महिलेचे प्रेत मिळाले असून ५ महिलांचा शोध घेतला जात आहे. चामोर्शी पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. बेपत्ता महिलांना शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ही दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबतही चौकशी सुरू आहे.

Gadchiroli: Name drowned in Wainganga river, one died. Five missing, one woman.. read news...

- A dead body of a woman was found, five people are missing.! A woman survived


Share News

copylock

Post Top Ad

-->