राष्ट्रवादी युवक कांग्रेस ने वनरक्षक भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची केली राहण्या खाण्याची मोफत सोय.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

राष्ट्रवादी युवक कांग्रेस ने वनरक्षक भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची केली राहण्या खाण्याची मोफत सोय.!

दि. 23.01.2024

Vidarbha News India 

राष्ट्रवादी युवक कांग्रेस ने वनरक्षक भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची केली राहण्या खाण्याची मोफत सोय.! 

Forest Guard Recruitment

विदर्भ न्यूज इंडिया 

गडचिरोली : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधाराने प्रेरित झालेल्या व 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या उद्दिष्टानुरुप चालणार्‍या राष्ट्रवादी युवक काँग्रेसने यावर्षी गडचिरोलीमध्ये वनभरती वनरक्षकाच्या मैदानी चाचणीसाठी राज्यातील विविध भागातून तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम, अति दुर्गम भागातून येणार्‍या युवक व युवतींची निवासाची व भोजनाची निःशुल्क सोय स्थानिक पटेल मंगल कार्यालयात केली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात वनरक्षक भरती forest guard recruitment मैदानी चाचणी 21 जानेवारीपासून घेण्यात येत आहे. 200 जागांकरीता असलेल्या या भरती प्रक्रियेकरीता 10 हजार उमेदवार सहभागी होणार आहेत. या मैदानी चाचणीसाठी राज्यातील व जिल्ह्यातील गोरगरीब उमेदवार येत असतात व ज्यांना गडचिरोलीमध्ये आल्यावर राहण्याची व भोजनाची सोय करण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागतात किंवा ते उमेदवार थंडीचे दिवस असून सुद्धा रस्त्यावर, बसस्थानक परिसरात रात्रीला उघड्यावर विसावा घेतात. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम व भाग्यश्री आश्रम यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली येथे या उमेदवारांची राहण्याची व भोजनाची मोफत सोय करून दिलेली आहे.

अशाच पद्धतीचा उपक्रम मागील दोन पोलिस भरतीमध्ये सुद्धा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसमार्फत करण्यात आला होता व ज्याचा फायदा या भरतीसाठी आलेल्या हजारो उमेदवारांनी करून घेतला. त्यामुळे यावर्षी होत असलेल्या forest guard recruitment वनरक्षक भरती मैदानी चाचणीसाठी येणार्‍या उमेदवारांची सोय सुद्धा रायुकाँमार्फत पटेल मंगल कार्यालयात करण्यात आलेली आहे. याचा फायदा येणार्‍या उमेदवारांनी करून घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कुणाल चीलगेलवार, हिमांशू खरवडे, चेतन पेंदाम, रितिक डोंगरे, गणेश बावणे यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

या forest guard recruitment उपक्रमासाठी जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, प्रा. रिंकु पापडकर, श्रीनिवास गोडसेलवार, युवक तालुका अध्यक्ष कुणाल चीलगेलवार, शहर अध्यक्ष हिमांशु खरवडे, सौरभ खोब्रागडे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष चेतन पेंदाम, रणजित रामटेके, रीतिक डोंगरे, गणेश बावणे, पराग दांडेकर, अंकुश झरली, अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहकार्य करीत आहेत.

Gadchiroli : Nationalist Youth Congress has provided free accommodation to the candidates who came for forest guard recruitment.




Share News

copylock

Post Top Ad

-->