दि. 19.01.2024
बांबू व्यवस्थापनातून ग्रामसभांना आत्मनिर्भर करण्याची आवश्यकता; - आमदार डॉ. देवराव होळी
- आमदार डॉ. देवराव होळी यांचे वन अधिकाऱ्यांना निर्देश.!
- आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या बांबू व्यवस्थापन संदर्भातील समितीची बैठक संपन्न.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात असणाऱ्या बांबू उत्पादनातून व त्याच्या व्यवस्थापनातून जिल्ह्यातील ग्रामसभांना सक्षम करून आत्मनिर्भर करण्याची आवश्यकता असून त्या दृष्टीने काम करावे असे निर्देश आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली मुख्य वनसंरक्षक कार्यालयात आयोजित सामूहिक वन हक्क व पेसा अंतर्गत बांबू कटाई च्या संदर्भातील विधानसभेद्वारा गठीत समितीच्या बैठकीच्या प्रसंगी केले.
गडचिरोली जिल्ह्यातील बाबू व्यवस्थापन व बांबू कटाई समस्या संदर्भातील समितीची बैठक मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आली.
बैठकीला वनसंरक्षक रमेश कुमार उप वन संरक्षक मिलिष शर्मा, सहाय्यक उपवन संरक्षक पटोळे, वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, आदिवासी नेते नंदू नरोटे, प्रणय खुणे यांचे सह वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.