दि. 28.02.2024
Vidarbha News India
राज्याच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प : - आमदार डॉ. देवराव होळी
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना. अजितदादा पवार यांनी विधानसभेत मांडलेला अर्थसंकल्प हा राज्याच्या विकासाला गती देणारा आहे, असल्याची प्रतिक्रिया गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी दिली.
या अर्थसंकल्पात राज्यातील गरीब, कामगार, मजूर, शेतकरी, सर्वसामान्य, उद्योगी अशा सर्वच वर्गाच्या हिताचा विचार करण्यात आला आहे. विकसीत भारताच्या संकल्पनेला गती देणारा जन कल्याणकारी अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना. अजितदादा पवार यांचे अभिनंदनही आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले आहे.