Gadchiroli : डीजीपी रश्मी शुक्ला यांची मन्नेराजाराम पोलीस स्टेशनला भेट.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

Gadchiroli : डीजीपी रश्मी शुक्ला यांची मन्नेराजाराम पोलीस स्टेशनला भेट.!

दि. 29.02.2024

Vidarbha News India 

Gadchiroli : डीजीपी रश्मी शुक्ला यांची  मन्नेराजाराम पोलीस स्टेशनला भेट.! 

विदर्भ न्यूज इंडिया 

गडचिरोली : Gadchiroli-DGP Shukla आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूका अतिसंवेदनशील ठिकाणी सुरळीत पार पडाव्यात यासाठी राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मन्नेराजाराम येथे भेट दिली.

Gadchiroli-DGP Shukla भेटी दरम्यान लोकसभा निवडणूकीच्या पृष्ठभूमीवर पोलिस स्टेशन मन्नेराजाराम येथील जवानांची स्टॅण्ड टू ड्रिल घेतली. तसेच येथील कामकाजाची पाहणी करुन उपस्थित अधिकारी व अंमलदार तसेच लहान मुले व नागरीकांसोबत संवाद साधला.Gadchiroli-DGP Shukla

गडचिरोली पोलिस दलाच्या विविध उपक्रमाचा लाभ घेवुन आपले जीवनमान उंचवावे, यासाठी भामरागड येथे पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या कृषी मेळाव्यात पोलिस महासंचालक यांच्या हस्ते व राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबईचे आयुक्त शिरीष जैन, विशेष पोलिस महानिरीक्षक संदिप पाटील, पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल यांच्या उपस्थितीत कृषी मेळाव्यात हजर नागरिकांना आंबा-40, चिक्कु-40 सिताफळ-40, फणस-40, लिंबू-40 यासह शेतकर्‍यांना कृषी उपयोगी अवजारांचे वाटप करण्यात आले. Gadchiroli-DGP Shukla 

यावेळी पोलिस महासंचालक शुक्ला यांनी म्हटले की, जनतेनी माओवाद्यांच्या खोट्या चळवळीला बळी न पडता गडचिरोली पोलिस दलाला सहकार्य करुन जिल्ह्याचा विकास साधावा. यासोबतच गावातील महिलांनी कृषी सहलीच्या माध्यमातून ज्ञान संपादन करुन विविध तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीच्या कामामध्ये पुरुषांना हातभार लाऊन आपला व आपल्या परिवाराचा आर्थिक विकास साधावा. Gadchiroli-DGP Shukla गडचिरोली जिल्ह्रातील शेतकरी सहलीच्या माध्यमातून जिल्ह्राबाहेर पडून पारंपरिक शेतीला बगल देत अत्याधुनिक शेती करणार्‍या शेतकर्‍यांच्या बांधावर जावुन तेथील परिस्थितीची, आधुनिक शेती व उपकरणांची पाहणी करतील. तेथील ज्ञानाचा वापर करून पारंपरिक शेती पध्दतीत बदल करतील.

Gadchiroli-DGP Shukla तसेच महिला शेतकर्‍यांची आर्थिक प्रगती व्हावी, या उद्देशाने उपविभाग एटापल्ली, हेडरी व भामरागड येथील एकुण 45 महिलांसाठी पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून एकुण बाराव्या कृषी दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले. सदर कृषी दर्शन सहल 1 मार्च ते 8 मार्च पर्यंत आयोजीत करण्यात आली आहे. या बाराव्या कृषीदर्शन सहलीला पोलिस महासंचालक शुक्ला यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभेच्छा दिल्या. Gadchiroli-DGP Shukla दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमांमध्ये पोलिस अधीक्षक नीलोत्पल, केंद्रीय राखीव पोलिस बल 191 चे कमांण्डंट एम.एस. खोब्राागडे, अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलिस अधीक्षक यतिश देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते हे उपस्थित होते.


Share News

copylock

Post Top Ad

-->