दि. 09 फेब्रुवारी 2024
गडचिरोली : १३ फेब्रुवारीला जंतनाशक दिन मोहीम, २ लाख २४ हजार बालकांना मिळणार गोळी
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम १३ फेब्रुवारी रोजी आरमोरी व चामोर्शी वगळता इतर १० तालुके तसेच शहरी भागात राबविण्यात येत असून १ ते १९ वर्षे वयोगटातील जिल्ह्यातील एकूण २ लाख २४ हजार १०३ बालकांना जंतनाशक गोळ्या खाऊ घालण्यात येणार आहेत.
शासकीय रुग्णालयात मिळते मोफत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालयासह सर्व शासकीय रुग्णालयात जंतनाशक गोळ्या मोफत उपलब्ध आहेत. शिवाय आरोग्य कर्मचारी या गोळ्यांचे वितरण करणार आहेत.
जंतांमुळे मुलांमध्ये ॲनिमिया पोटदुखी, उलट्या, अतिसार, मळमळ, भूक मंदावणे, शौचामध्ये रक्त पडणे, आतड्यावर सूज येणे आदी आजारांचा धोका असतो. त्यामुळे १ ते १९ वर्षे वयोगटातील प्रत्येक जंतनाशक गोळी देणे आवश्यक आहे. बालकाला जेणेकरून या वयोगटातील मुलांना परजिवी जंतांपासून आजार होण्याचा धोका उद्भवणार नाही. दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे हा आजार सहजतेने होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक पालकांनी जागरूक राहून आपल्या पाल्यांना जंतनाशक गोळ्या खाऊ घातल्या पाहिजे. या गोळ्या सर्व शासकीय रुग्णालयात मोफत उपलब्ध आहेत. आरोग्य विभागामार्फत गोळ्या वाटप होतील.
■ १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींनी सहा महिन्यांतून एकदा म्हणजे, वर्षातून दोनदा ही जंतनाशक गोळी खाल्ली पाहिजे. जेणेकरून बालकांचे आरोग्य व पोषणस्थिती चांगली राहील.
राज्य शासनातर्फे वर्षभरात दोन लाख मुलांना वाटप राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत वर्षभरात दोनदा जंतनाशक गोळ्यांचे वितरण केले जाते. आता या मोहिमेंतर्गत १३ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील २ लाख २४ हजार १०३ बालकांना या गोळ्या मोफत खाऊ घालण्यात येणार आहेत.
🔷 अंगणवाडी सेविका, शिक्षक, आशावकर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मार्फतीने जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम १३ फेब्रुवारी रोजी राबविण्यात येणार आहे. आरमोरी व चामोर्शी तालुके वगळता संपूर्ण जिल्ह्यात बालकांना जंतनाशक गोळ्या खाऊ घालण्यात येणार आहेत. सुटलेल्या बालकांसाठी २० फेब्रुवारीला जंतनाशक गोळ्या उपलब्ध होतील.
- डॉ. दायल साळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली,