दि. 08.02.2024
चामोर्शी गोंड मोहल्ला येथिल सभागृहाचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते भूमिपूजन.!
- 20 लक्ष रुपयाचे विकास कामाचे भूमिपूजन.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/चामोर्शी : शहरातील जुनी वस्ती गोंड मोहल्ला येथिल अनेक वर्षांपासून जुने असलेले मंदिर मोळकलीस आले असल्याने स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार येथिल सभागृहासाठी 20 लक्ष रुपये मंजूर केले त्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार महोदयांचे हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, तालुका उपाध्यक्ष जयराम चालख, युमो तालुका अध्यक्ष निखिल धोडरे, सतीश भांडेकर, संतोष भांडेकर तथा स्थानिक नागरिक उपस्थित होते.
भूमिपूजन केल्याबद्दल स्थानिक नागरीकांनी आभार मानले.!