गाव चलो अभियानांतर्गत भाजपातर्फे प्रत्येक गाव व बूथवर जणसंपर्क करणार; खा. अशोक नेते यांची पत्रकार परिषदेत माहिती - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

गाव चलो अभियानांतर्गत भाजपातर्फे प्रत्येक गाव व बूथवर जणसंपर्क करणार; खा. अशोक नेते यांची पत्रकार परिषदेत माहिती

दि. 07 फेब्रुवारी 2024
Vidarbha News India 
गाव चलो अभियानांतर्गत भाजपातर्फे प्रत्येक गाव व बूथवर जणसंपर्क करणार; खा. अशोक नेते यांची पत्रकार परिषदेत माहिती 
विदर्भ न्यूज इंडिया 
गडचिरोली :  संपूर्ण देशभरात भारतीय जनता पार्टी तर्फे गाव चलो अभियान राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक गाव व बुथ वर भाजपाचे प्रमुख पदाधिकारी मुक्कामी थांबणार असून या प्रवासी कार्यकर्त्यांकडून केंद्र व राज्यसरकारच्या योजनांची माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहचवीत मतदारांशी संपर्क साधणार असल्याची माहिती खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते व जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी कॅम्पलेक़्स जवळील शासकीय विश्राम गृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. 
दहा वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशात सर्व क्षेत्रात प्रचंड गतीने विकास केला. गरीब कल्याण, महिला सशक्तिकरण, देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा अश्या अनेक क्षेत्रात मोदी सरकारने मोठी कामगिरी करत आंतरराष्ट्रीय पातळीवरही देशाचे नाव उंचावले आहे. मोदी सरकार ला भाजपा शासित अनेक राज्य सरकारांनिही उत्तम साथ देत आपआपल्या राज्यात मोठा विकास केला आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारांची यशोगाथा तळागाळा पर्यंत पोहचवण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी देशभरात गाव चलो अभियान सुरु करण्याचा संकल्प केला आहे. या अभियानात प्रत्येक गावात व बुथवर भाजपाचे प्रशिक्षित प्रवासी कार्यकर्ते मुक्कामी  थांबून बुथ वर पूर्णवेळ लक्ष केंद्रित करणार आहेत. बुथवरील प्रत्येक घरी मोदी सरकारने राबविलेल्या योजनांची माहिती दिल्या जाणार आहे.
आगामी निवडणुकांची तयारी म्हणून भाजपने बुथ मजबुतीकरणावर भर दिला आहे. बुथस्तरावरील मतदारांशी संवाद साधून त्यांच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी वरिष्ठ नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी हे प्रवासी कार्यकर्ते म्हणून बुथस्तरावर मुक्कामी जाणार असल्याची माहिती भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते आणि जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
हे अभियान येत्या ११ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यासाठी जिल्हा संयोजक म्हणून भाजपच्या किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय विधानसभानिहाय संयोजकांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यात गडचिरोलीसाठी प्रकाश गेडाम, आरमोरीसाठी सदानंद कुथे तर अहेरीसाठी संदीप कोरेत यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय २४ मंडळांमध्ये २४ संयोजक नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हाभरातील ९३३ बुथवर हे अभियान राबविले जाणार आहे. या अभियानात सर्वसमावेशक बुथरचनेची तपासणी केली जाणार असून आवश्यक ते बदलही ते करतील.
या पत्रपरिषदेला लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी, विधानसभा विस्तारक दामोदर अरिगेला, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गिता हिंगे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, जिल्हा सचिव रंजिता कोडाप, जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, अनिल कुनघाडकर, विनोद देवोजवार,सलीमभाई, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
🔷 नुकत्याच 2024-25 मधील सादर केलेल्या आर्थिक बजेट मध्ये वडसा -गडचिरोली रेल्वे मार्गासाठी भरिव 120 कोटी निधी मंजूर..!
- खासदार अशोक नेते यांची पत्रकार परिषदेत माहिती.!
- वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गासाठी १२० कोटी मंजूर.! 
वडसा ते गडचिरोली या रेल्वेमार्गासाठी यापूर्वी ३२२ कोटी रुपये मंजूर झाले आहे. नुकत्याच सादर झालेल्या केंद्र सरकारच्या बजेटमध्ये पुन्हा १२० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे रेल्वेमार्गाचे काम जोमाने सुरू आहे. राज्य सरकारकडूनही त्यांचा ५० टक्के वाटा या प्रकल्पासाठी मिळणार असल्याचे यावेळी खा.अशोक नेते यांनी सांगितले.

Share News

copylock

Post Top Ad

-->