दि. 06 फेब्रुवारी 2024
Vidarbha News India
16 फेब्रुवारीपासून गडचिरोलीत पाच दिवस महासंस्कृती महोस्तवाचे आयोजन.!
- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पटांगणात रंगणार महानाट्य.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत नाविन्यपुर्ण कार्यक्रमाचे आयोजन राज्याचा सांस्कृतिक विभाग, जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन तसेच स्वातंत्र्य लढयातील ज्ञात व अज्ञात लढवाययांची माहिती इत्यादी बाबी जनसामान्यपर्यंत पोहचविण्यासाठी दिनांक दिनांक 16 फेब्रुवारी 2024 ते 20 फेब्रुवारी 2024 पर्यत जिल्ह्यात पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ गडचिरोलीच्या पटांगणात होणार आहे. जिल्हाधिकारी, गडचिरोली संजय मीणा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी, गडचिरोली सुनिल सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी, कुरखेडा, विवेक सांळुके तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ गडचिरोलीच्या पटांगणात दिनांक 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी पर्यंत संध्याकाळी 6.00 पासून विविध कार्यक्रम सुरुवात होणार आहे. 5 हजारापेक्षा जास्त प्रेक्षकांच्या साक्षीने फिरत्या रंगमंचावर रंगणार आहे. यासाठी प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे.
दररोज सायंकाळी 6 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल. तरी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी, गडचिरोली संजय मीणा यांनी जनतेला आवाहन केले आहे.
Mahasanskrit Mahostava organized for five days in Gadchiroli from February 16.!
Mahanathya will be staged in Patangan of Maharashtra Industrial Devel