दि. 07 फेब्रुवारी 2024
Vidarbha News Indiaहिरकणी कक्ष व महिला सुविधा केंद्राचा लोकार्पण तथा उदघाटन सोहळा जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते सपन्न.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : शासकीय कार्यालयात कामानिमीत्य येणाऱ्या महिलांच्या अडचणी, त्यांच्या समस्या लक्षात घेता, बालकास स्तनपान करण्याकरिता सर्वप्रथम पंचायत समिती व उपविभागीय कार्यालय गडचिरोली परिसरात हिरकणी कक्ष तथा महिला सुविधा केंद्राचे लोकार्पण तथा उदघाटन सोहळा जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी हिरकक्षी कक्षाचा वापर कामानिमित्य येणाऱ्या सर्व महिलांनी घ्यावा तसेच त्याचा योग्य वापर करण्यात यावा. महिला करिता सर्व सुविधायुक्त असणारे हिरकणी कक्ष हा एक चांगला उपक्रम असुन पुढील टप्यात सर्व तहसिल कार्यालय, सर्व नगर पंचायत/नगर परिषद मध्ये अशा प्रकारचे सुविधा केंद्र उपलब्ध करुन देण्यात येईल असे उदघाटनीय प्रसंगी बोलत होते. सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, राहुल मीणा यांनी पंचायत समीती व उपविभागीय कार्यालय परिसरात कामानिमीत्य बऱ्याच महिला येत असतात बऱ्याच वेळा त्या लहान मुलांना सोबत घेवून येतात अशा महिलांकरिता हे केंद्र खुप फायदेशिर ठरणार असे भाषणातुन बोलत होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प गडचिरोली, आयुषी सिंग यांनी हिरकणी कक्षाच्या माध्यमातुन महिलांना चागल्या प्रकारचे लाभ मिळणार असून हे महिलांकरिता आनंदाची बाब असून अशा प्रकारचे उपक्रम सुरु केल्याबदल महिला व बाल विकास विभागाचे त्यांनी कौतुक केले असून जिल्हा परिषद व इतर शासकीय कार्यालय परिसरात अशाच प्रकारचे केंद्र स्थापन करण्याबाबत अध्यक्षीय भाषणातुन मत व्यक्त केले.
गडचिरोली जिल्हयातील तालुका स्तरावरील सार्वजनिक ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी शेकडो महिला शासकीय कार्यालयात येत असतात व त्यांच्या सोबत त्यांची लहान मुले सुद्धा असतात अशा महिलांना त्यांच्या बालकांना स्तनपान करण्याकरिता सुरक्षित जागा नसल्याने बालकांना योग्य वेळेत स्तनपान / पोषण मिळत नाही अशा वेळी बालकाला अनेक वेळा उपाशी राहवे लागते त्यामुळे अशा बालकांच्या तब्बेतीवर परिणाम होवून कुपोषण वाढण्याची शक्यता असते व त्यांच्या मातांना देखील मानसिक त्रास सहन करावा लागतो. अशा महिलांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीकोनातुन हिरकणी कक्ष तथा महिला सुविधा केंद्र उपलब्ध करुन देण्यात आले आहे असे प्रास्ताविक भाषणातुन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी माहिती दिली.
सदरची आवश्यकता विचारात घेवून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने जिल्हयातील तालुकस्तरावरील पंचायत समितीच्या कार्यालयाच्या परिसरात हिरकणी कक्ष बसविण्यासाठी जिल्हा नियोजन समिती गडचिरोली अंतर्गत महिला व बाल विकास विभाग ३% टक्के राखीव निधीमधुन सन २०२३-२४ करिता गडचिरोली जिल्हयातील १२ पंचायत समीत्या व ६ उपविभागीय कार्यालयाच्या परिसरात शासकीय कामाने येणाऱ्या स्तनदा माता, मुली, महिला, वृदध महिला यांना आवश्यक त्या सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने जिल्हयात एकुण १८ ठिकाणी जिल्हा नियोजन समीती मधुन 3 टक्के निधीमधून मंजूरी घेवून हिरकणी कक्ष तथा महिला सुविधा केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. महिलांकरिता आवश्यक सर्वकष सुविधा उपलब्ध करुण देण्यात आलेले आहे त्याअनुषंगाने सर्वप्रथम पंचायत समीती व उपविभागीय कार्यालय गडचिरोली परिसरात हिरकणी कक्ष तथा महिला सुविधा केंद्राचे लोकार्पण तथा उदघाटन सोहळा दिनांक ६ फेब्रुवारी २०२४ रोज मंगळवार ला जिल्हाधिकारी, गडचिरोली, संजय मीणा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. गडचिरोली, श्रीमती आयुषी सिंग प्रमुख अतिथि म्हणून सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गडचिरोली, राहुल मीणा, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गडचिरोली, प्रकाश भांदककर, गट विकास अधिकारी पंचायत समीती गडचिरोली, सुरेद्र गोंगले, बाल विकास प्रकल्प अधिकारी गडचिरोली, सिंधु गाडगे, हेमलता परसा गट शिक्षणधिकारी पंचायत समीती गडचिरोली, जिल्हा परिविक्षा अधिकारी विनोद पाटील, वरिष्ठ संरक्षण अधिकारी रुपाली काळे, तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते जयंत जथाडे, क्षेत्र कार्यकर्ता रविंद्र बंडावार, निलेश देशमुख, लोमेश गेडाम व महिला व बाल कल्याण विभाग येथील अधिकारी कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. अशा प्रकारचे सर्व सुविधायुक्त अदयावत असणारा हिरकणी कक्ष तथा महिला सुविधा केंद्र जिल्हयातील पहिले केंद्र असून यामध्ये महिलांकरिता अदयावत स्वच्छता गृह, पिण्याच्या पाण्याकरिता वॉटर प्युरिफायर, महिलांकरिता सॅनेटरी नॅपकीन ( वेंडर मशीन), लहान बालकांना खेळण्याकरिता खेळणी, एक बेड, बालकांना सानपान करण्याकरिता फींडीग चेअर, लहान बालकांना बसण्याकरिता चेअर, महिलांच्या सुरक्षाच्या दुष्टीकोनातुन सि.सि.टिकी कॅमेरा बाहेरच्या बाजुला बसवण्यात आले आहे इत्यादी सुविधा केंद्रात उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
Inauguration and opening ceremony of Hirakni room and Women's Facility Center was done by Collector Sanjay Meena.