Gadchiroli : एसटी बसमध्ये महिलेच्या बॅगमधून 2.42 लाखांच्या दागिन्याची चोरी.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

Gadchiroli : एसटी बसमध्ये महिलेच्या बॅगमधून 2.42 लाखांच्या दागिन्याची चोरी.!

दि. 13.02.2024

Vidarbha News India 

Gadchiroli : एसटी बसमध्ये महिलेच्या बॅगमधून 2.42 लाखांच्या दागिन्याची चोरी.!

Theft News Gadchiroli :

विदर्भ न्यूज इंडिया 

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमधील प्रवास सुरक्षित मानला जातो. मात्र गेल्या काही दिवसांपासून रापमच्या बसमध्ये चोरीचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांना सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे.

सोमवारी, 12 फेब्रुवारी रोजी नागपूरहून गडचिरोलीला येणार्‍या महिलेच्या बॅगमधून सात हजार रुपयांच्या रोख रकमेसह 2 लाख 42 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने बसमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर संबंधित महिलेने गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली शहरातील कॅम्प एरिया परिसरात राहणारी प्राची समीर कनकावार ही महिला रविवारी नागपुरात आयोजित साक्षगंधाच्या कार्यक्रमाला गेली होती. सोमवारी सकाळी 10 वाजता ती तिच्या कुटुंबियांसह नागपूर बसस्थानकावरून गडचिरोलीला येणार्‍या बसमध्ये चढली. ही बस दुपारी दीड वाजता गडचिरोलीला पोहोचल्यानंतर महिला व तिचे कुटुंबीय बसमधून उतरून घरी गेले. मात्र घरी गेल्यानंतर महिलेच्या बॅगेची चैन तुटलेली आढळून आली. त्यामुळे बॅगची तपासणी केली असता बॅगेत ठेवलेले सोन्याचे दागिने व 7 हजार रुपये गायब असल्याचे आढळून आले. त्यामुळे महिलेने तत्काळ गडचिरोली पोलिस ठाणे गाठून घटनेची तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी तपासले सीसीटीव्ही फुटेज

प्रवासादरम्यान आपल्या बॅगेतील 2 लाख 42 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची तक्रार महिलेने नोंदवताच गडचिरोली शहर पोलिसांच्या पथकाने तत्काळ बसस्थानक गाठून बसस्थानक आवारातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तक्रारदार महिलेने एका महिलेवर संशय व्यक्त केला आहे. त्या दिशेने पोलिस तपास करत आहेत.

चोरट्यांची टोळी सक्रिय असण्याची शक्यता

दोन दिवसांपूर्वी आष्टी ते गडचिरोली या बसमधून प्रवास करणार्‍या महिलेच्या बॅगमधून अज्ञात चोरट्याने 70 हजार रुपयांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली होती. आता सोमवारी नागपूर ते गडचिरोली प्रवास करणार्‍या महिलेच्या बॅगेतून 2 लाख 42 हजार रुपयांचे दागिने आणि 7 हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्यानंतर बसेसमध्ये चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याचे बोलले जात आहे.


Share News

copylock

Post Top Ad

-->