दि.13.02.2024
लखमापूर बोरी येथील पूल व बंधाऱ्याचे आमदार डॉ. देवराव होळी यांचे हस्ते भूमिपूजन
- मागील अनेक वर्षापासून प्रलंबित बंधाऱ्याला २ कोटी रुपयांची मंजुरी मिळवून दिल्याने आमदार महोदयांचे गावकऱ्यांनी मानले आभार
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/चामोर्शी : मागील अनेक वर्षांपासून सातत्याने मागणी असलेल्या व मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या लखमापूर बोरी ते नवीन वाकडी येथील २ कोटी रुपयांच्या पूल वजा बंधाऱ्याचे आमदार डॉ. देवराव होळी यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या बंधाऱ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार असून गावकऱ्यांनी आमदार महोदयांना धन्यवाद देत त्यांचे आभार मानले.
महाराष्ट्र शासन मृद व जलसंधारण विभाग गडचिरोलीच्या माध्यमातून मृद व जलसंधारण महामंडळ औरंगाबाद निधी अंतर्गत कोल्हापुरी पॅटर्न वरील पूल वजा बंधाऱ्याचे लखमापूर बोरी ते नवीन वाकडी या कामाचे भूमिपूजन आमदार महोदय यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, सरपंचा किरणताई सुरजागडे, अरुण सुरजागडे, प्रतीक राठी, जोंधरू नैताम, भाग्यवान पिपरे,रामदास जुवारे, संजय वैरागडे, रायसिडाम यांचे सह ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.