दि. 23.02.2024
Vidarbha News India
विकास कामांची अंमलबजावणी करण्यासाठी समन्वयाने काम करा; - आमदार डॉ. देवराव होळी
Implementation of development works :
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक विभागाने एकमेकांच्या सहकार्याने व समन्वयाने काम करावे, अशा सूचना आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेत उपस्थित अधिकारी व कर्मचार्यांना केल्या.
गडचिरोली पंचायत समितीच्यावतीने आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली आज, 23 फेब्रुवारी रोजी वार्षिक आमसभेचे आयोजन जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या सभागृहात करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.
या आमसभेला संवर्ग विकास अधिकारी सुरेंद्र गोंगले, माजी पंचायत समिती सभापती मारोतराव इचोडकर, माजी उपसभापती विलास दशमुखे, माजी पंचायत समिती सदस्य रामरतन गोहणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हेमंत बोरकुटे, नायब तहसीलदार ठाकरे यांच्यासह मान्यवर मंचावर उपस्थित होते.