दि. 23.02.2024
युवा पिढीने शिवरायांचे विचार आत्मसात करावेत; - माजी पालक मंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम
- वडसा येथे भव्य जाहीर व्याख्यान कार्यक्रम.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यातील राज्यकारभारामध्ये भारतीय लोकशाहीची बीजे रोवली होती. भारतीय स्वातंत्र्याची प्रेरणा ही छत्रपती शिवाजी महाराजांचीच होती. निष्पक्ष, निरपेक्ष राज्यपद्धतीतून त्यांनी राज्यकारभार केला असल्याचे सांगत आजच्या युवा पिढीने छत्रपती शिवरायांचे विचार आत्मसात केले पाहिजेत, अशी अपेक्षा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम व्यक्त केली.
गुरुवार दि. 22 रोजी शिवजन्मोत्सव समिती टायगर ग्रुप देसाईगंज (वडसा) तर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य जाहीर व्याख्यान कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी आमदार कृष्णा गजबे,पद्मश्री डॉ परशुराम खुणे, युवानेते अवधेशराव आत्राम,सुप्रसिद्ध युवा व्याख्याते,समाज प्रबोधनकार सोपान कानेरकर महाराज,डॉ.नामदेव किरसान,आकाश अग्रवाल,गणेश फाफट,रामदास मसराम,विक्की बाबू रामाणी,शालू दंडवते,प्रिन्स अरोरा, मोहन वैद्य आणि अतुल डांगे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपला देश पुढे चालला आहे. येणाऱ्या काळात भारत देश इतर देशांच्या तुलनेत बरोबरी करणार अशी आशा आहे. मात्र,त्यासाठी युवा पिढीला सुद्धा पुढाकार घ्यावा लागणार आहे. देशाचे भविष्य हे युवा पिढीच्या खांद्यावर आहे. त्यामुळे तुम्ही शिवरायांनी सांगितलेल्या मार्गावर चला असे आवाहन देखील त्यांनी केले. टायगर ग्रुपच्या या कार्यक्रमामुळे वडसा शहरात परत एकदा येण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे देखील प्रत्येक कार्यक्रमात सहकार्य करणार असल्याचे त्यांनी आश्वासित केले. दरम्यान शहरात आगमन होताच टायगर ग्रुप तर्फे त्यांचे जंगी स्वागत करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
आयोजित कार्यक्रमात आमदार कृष्णा गजबेसह इतर मान्यवरांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले.तर युवा व्याख्याते,समाज प्रबोधनकार सोपान दादा कानेरकर आपल्या प्रबोधनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम व युवा व्याख्याते सोपान कानेरकर महाराज सर्वांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू होते हे विशेष.त्यामुळे हजारो नागरिकांची उपस्थिती होती.