मार्कंडा देवस्थान जिर्णोद्धाराच्या कामाला गती द्या; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

मार्कंडा देवस्थान जिर्णोद्धाराच्या कामाला गती द्या; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दि. 04 फेब्रुवारी 2024

Vidarbha News India 

मार्कंडा देवस्थान जिर्णोद्धाराच्या कामाला गती द्या; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विदर्भ न्यूज इंडिया 

गडचिरोली : मार्कंडा देवस्थान जिर्णोद्धाराच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुरातत्व विभागाला दिले.

मार्कंडा देवस्थानच्या विकासाकरिता एमएमआरडीसी च्या माध्यमातून मंजूर 100 कोटी रुपये व पुरातत्त्व विभागाच्या पाच कोटी रुपयांच्या प्रलंबित विकास कामांचा आढावा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज घेतला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

महाशिवरात्रीला प्रथा परंपरेनुसार मंदिर परिसरात प्रसाद वितरणाला रोक न लावण्याच्या सूचनाही फडणवीस यांनी केल्या.

तत्पुर्वी देवस्थानाची पाहणी करुन येथील हेमाडपंथी शिल्पकृतीबाबतची विशेषता व माहिती त्यांनी जाणून घेतली. खासदार अशोक नेते, आमदार देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीणा, जिल्हा पोलिस अधीक्षक  निलोत्पल, मार्कंडा देवस्थानचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्यूंजय गायकवाड, भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक अरुण मलिक, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यावेळी उपस्थित होते.

speed up the restoration work of Markanda Devasthan; Deputy Chief Minister Devendra Fadnavis 

Share News

copylock

Post Top Ad

-->