दि. 04 फेब्रुवारी 2024
Vidarbha News Indiaगडचिरोली : वीज प्रवाहाच्या झटक्याने विद्युत कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : वीज ग्राहकाच्या तक्रारीच्या अनुषंगाने वीज रोहित्रावर चढून विज पुरवठयाची दुरूस्ती करताना वीज प्रवाहाचा झटका लागल्याने खाली कोसळून लाईनमॅनचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी रविवारला सकाळी ११ वाजताच्या सूमारास येथील चामोर्शी मार्गावरील जिल्हा परीषद माध्यमिक शाळेच्या जवळ घडली. जितेंद्र गज्ज्लवार (४१) रा. भातगिरणी परीसर सर्वादय वार्ड गडचिरोली असे मृतक लाईनमनचे नाव आहे.
गज्जलवार हे महावितरणच्या गडचिरोली शहर शाखेत लाईनमन पदावर नियमित कर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यांचे मुळ गाव चंद्रपूर जिल्हयाच्या सावली तालुक्यातील बोरमाळा हे आहे. महावितरणच्या शहर शाखेत प्राप्त झालेल्या विज ग्राहकांच्या तक्रारीनूसार विजपुरवठा सुरळीत करण्यासाठी जितेंद्र गज्ज्लवार हे चामोर्शी मार्गावर सकाळी आले. दरम्यान जि. प. शाळेच्या परीसरातील वीज रोहित्रावर चढून विज सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.
त्यापूर्वी त्यांनी डिपीवरील राळ बंद केल्याने संपुर्ण ट्रान्सफार्मर वरील विज पुरवठा बंद झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र काही वेळातच वीज प्रवाहारच्या तीव्र झटक्याने गज्जलवार हे खाली कोसळले. दरम्यान त्यांच्या डाेक्याला जखम होऊन खाली रक्त सांडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान यावेळी त्यांचा हात व कपडे जळाले.
नागरीकांकडून घटनेची माहीती मिळताच महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. गडचिराेली पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आला.
कुटुंबीयांनी फोडला हंबरडा
कर्तव्य बजावताना पतीचा मृत्यु झाल्याची धक्कादायक बातमी कळताच पत्नीसह त्यांच्या कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. जिल्हा सामान्य रूग्णालयात कुटुंबीय व नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला.
Gadchiroli : Electrical worker died on the spot due to electrocution.