नागरिकांच्या सहकार्याने गडचिरोलीतील नक्षलवाद संपवणार : पोलिस महासंचालक DGP रश्मी शुक्ला - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

नागरिकांच्या सहकार्याने गडचिरोलीतील नक्षलवाद संपवणार : पोलिस महासंचालक DGP रश्मी शुक्ला

दि. 17.02.2024

Vidarbha News India 

नागरिकांच्या सहकार्याने गडचिरोलीतील नक्षलवाद संपवणार : पोलिस महासंचालक DGP रश्मी शुक्ला

विदर्भ न्यूज इंडिया 

गडचिरोली : स्थानिक नागरिकांच्या सहकार्यातून गडचिराेली जिल्ह्यातील नक्षलवाद पूर्णपणे संपवला जाईल असा विश्वास राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केला.

दरम्यान गडचिरोलीच्या दुर्गम अतिदुर्गम भागात कार्यरत असलेल्या जवानांना बेसिक सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी आपण पुढाकार घेणार असून प्रत्येक महिन्यात गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करू असेही शुक्ला यांनी नमूद केले. (Maharashtra News)

राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचा पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदाच पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या शनिवारी गडचिरोलीच्या अतिदुर्गम छत्तीसगड सीमेवरील गर्देवाडा भागात पोहोचल्या.

यावेळी त्यांनी येथे उभारण्यात आलेल्या नवीन पोलीस ठाणे परिसराची पाहणी केली. एक ते दीड महिन्यापूर्वी येथे एका दिवसांमध्ये जिल्हा पोलीस दलाने नव्या पोलीस ठाण्याची निर्मिती केली. या पोलीस ठाण्याच्या परिसराची पोलीस महासंचालक शुक्ला यांनी पाहणी करून नक्षल समस्येचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत राज्य गुप्त वार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, नक्षलसेल गडचिरोली परिक्षेत्राचे आयजी संदीप पाटील (sandip patil), डीआयजी अंकित गोयल (ankit goyal) उपस्थित होते.

यावेळी पोलीस दलातर्फे आयोजित जनजागरण मेळाव्याला संबोधित करत मेळाव्यात उपस्थित आदिवासी नागरिकांना शेती, घरगुती, शालेय, क्रीडा साहित्याचे वाटप केले. या मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करताना आदिवासी नागरिकांनी पोलीस दलाला सहकार्य करावे असे आवाहन करीत जिल्हा पोलीस आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास शुक्ला यांनी दिला. यावेळी त्यांनी मेळाव्यातील उपस्थित विद्यार्थिनी आणि नागरिकांशी संवाद साधला.

पोलीस महासंचालकांसमोर जवानांनी वाचला समस्यांचा पाढा

दुर्गम भागात कार्यरत पोलीस जवानांसाठी शुक्ला यांनी दरबार भरवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी उपस्थित जिल्हा पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल, केंद्रीय पोलीस दलाच्या जवानांनी दुर्गम भागात कर्तव्य बजावताना येणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला. जवानांच्या समस्या शासन स्तरावरून सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असून वेगवर्धित पदोन्नती, विशेष कामगिरीसाठी रिवार्ड या प्रक्रियेमध्ये काही बदल लवकरच केले जातील असे शुक्ला यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.

Naxalism will end in Gadchiroli with the cooperation of citizens: Director General of Police Rashmi Shukla 


Share News

copylock

Post Top Ad

-->