सांस्कृतिक महोत्सवात लोककलांचा जागर.! लावणी नृत्यांनी जिंकली प्रेक्षकांची मने - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

सांस्कृतिक महोत्सवात लोककलांचा जागर.! लावणी नृत्यांनी जिंकली प्रेक्षकांची मने

दि. 17.02.2024
Vidarbha News India 
सांस्कृतिक महोत्सवात लोककलांचा जागर.!
लावणी नृत्यांनी जिंकली प्रेक्षकांची मने
विदर्भ न्यूज इंडिया 
गडचिरोली : सांस्कृतिक महोत्सवात आज दंडार, गोंधळ, रेला नृत्य आणि लावणी या लोककलांचा मेजवानी प्रेक्षकांना मिळली. या रावजी, बसा भावजी’, वाट पाहते मी ग येणार साजन माझा, मी ऐवज हवाली केला, सांगा मी कशी दिसते यांसारख्या रंगतदार शृगांरीक लावण्यांची रंगबाजी आज सांस्कृतिक महोत्सवात बघायला मिळाली. मेघा घाडगे व सहकलाकांरांनी आपल्या दिलखेचक अदाकारीं आणि नृत्यासह  लावण्या सादर करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.
गडचिरोली येथे सुरू असलेल्या सांस्कृतिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी झाडीपट्टी गृपचे हरिचंद्रा बोरकर यांनी आज दंडार, गोंधळ, तर छत्तीसगडच्या कलाकारांनी रेला नृत्य आणि मेघा घाटगे व सहकलाकारांनी लावणी कार्यक्रम सादर केला.
सांस्कृतिक महोत्सवात लावण्यांची सुरुवात गणेशवंदनाने झाली. त्यानंतर लांवण्यांवतींनी पारंपरिक लावण्या सादर केल्या, नखशिखांत सजलेल्या नृत्यगंनांनी लावण्या सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाला महिलांनी उपस्थितीदेखील मोठ्या संख्येने होती. यावेळी लावणी नृत्याचा मनमुराद आनंद प्रेक्षकांनी लुटला. 
सुरवाताली सादर करण्यात आलेल्या ‘कशी मी जावू मथुरेच्या बाजारी’ या गवळणातून श्रीकृष्ण व  गोपिकांची नटखट जुगलबंदी, त्यानंतर आदिवासी समाजाचा सांस्कृतिक वारसा जोपासणाऱ्या दंडार लोकनृत्य व त्याच्या साथीला वाद्य संगीतासाठी विशेष ढोलक्या, फेफाऱ्या (पुंग्या), ढोल, ढोलकं, तुडमुडी, बासरी, डफ, मृदंग, घुंगरू, टाळ आदी साहित्याच्या वापराने दंडार नृत्याने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. 
पुढील तीन दिवस महासांस्कृतिक कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार असून जास्तीत जास्त रसिकांनी या महोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->