स्वप्निल वरघंटे यांच्या अकाली एक्झिटने हळहळले चामोर्शीकर, अंत्यसंस्काराला हजारोंची उपस्थिती.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

स्वप्निल वरघंटे यांच्या अकाली एक्झिटने हळहळले चामोर्शीकर, अंत्यसंस्काराला हजारोंची उपस्थिती.!

दि. 24.02.2024
Vidarbha News India 
स्वप्निल वरघंटे यांच्या अकाली एक्झिटने हळहळले चामोर्शीकर, अंत्यसंस्काराला हजारोंची उपस्थिती.!
- एकनिष्ठ, अजातशत्रू कार्यकर्ता गमावला; - खासदार अशोक नेते.
विदर्भ न्यूज इंडिया 
गडचिरोली/चामोर्शी : भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि सुरूवातीपासून भाजपशी जुळून असलेले युवा कार्यकर्ते स्वप्निल वरघंटे (४१ वर्ष) यांचा शुक्रवारच्या पहाटे अचानक प्रकृती बिघडून हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.आज शनिवारी सकाळी त्यांच्यावर  शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खासदार अशोक नेते यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि चामोर्शी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फुलांनी सजवलेल्या वाहनावरून चामोर्शी शहरातून अंत्ययात्रा काढून मार्कंडेश्वर मंदिराजवळील वैनगंगेच्या घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यादरम्यान 'स्वप्निल वरघंटे अमर रहे...' असे नारे नागरिकांकडून दिले जात होते. यावेळी झालेल्या शोकसभेत बोलताना खा.नेते म्हणाले, एक अजातशत्रू, निष्ठावंत आणि सतत धडपड करणारा कार्यकर्ता मी गमावला आहे. त्याच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे.वयाच्या अल्पवयात राजकीय जीवनाला सुरूवात करून तत्कालीन चामोर्शी ग्रामपंचायतमध्ये पक्षाची सत्ता बसवण्यापासून तर दिग्गज उमेदवाराला हारवून जिल्हा परिषदवर निवडून जाईपर्यंत त्यांनी लोकसंग्रह जमविला होता. चामोर्शी जनतेच्या मनातला हिरा आज गमावला अंत्ययात्रेला जमलेली मोठी गर्दी हे त्याचेच प्रतिक असल्याचे खा.नेते म्हणाले.
या शोकसभेत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, डॅा.मिलिंद नरोटे, धोबी समाज संघटनेचे भैयाजी रोहणकर, नगरसेवक सुनील तुरे, महेश अल्लावार, डॅा.दुधबळे, चांदेकरजी, गजानन बारसागडे  अशा अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी अंत्यविधीला कि.आ. प्रदेश सचिव रमेश भूरसे,प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, भारत खटी,माजी सभापती संतोष तंगडपल्लीवार, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल तिडके,ओबिसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, कि.आ. जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, तालुकाध्यक्ष आनंद भांडेकर, शहराध्यक्ष सोपान नैताम, गोवर्धन चव्हाण, सोमय्या पसूला,सुधाकर पेटकर, माणिक कोहळे,सोपान नैताम,आशिष पिपरे,सुरेश शहा, दिलिप चलाख,चेतन गोरे, रमेश अधिकारी,विनोद गौरकर,नरेश अल्लसावार, भाष्कर बुरे,निखील धोडरे,रेवनाथ कुसराम तसेच बहुसंख्येनी नागरिक उपस्थित होते.

जीव वाचविण्यासाठी सर्वांची धडपड

गुरूवारच्या मध्यरात्री दिड वाजताच्या सुमारास स्वप्निल यांना हार्टअटॅक आला. चामोर्शीत प्राथमिक उपचार करून लगेच गडचिरोलीत हलविले जात असताना वाटेत त्यांना पुन्हा हृदयविकाराचा दुसरा अटॅक आला. गडचिरोलीत जिल्हा सामान्य रुग्णालयात व्हेंटिलेटर लावून सर्व प्रकारचे उपचार करण्यात आले. त्याचदरम्यान गोंदिया जिल्ह्यातील कचारगड, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील घोडायात्रा येथील कार्यक्रम आटोपून खा.अशोक नेते पहाटे ४ च्या सुमारास गडचिरोलीच्या वाटेवर असताना त्यांना याबद्दल कळले. त्यांनी लगेच जिल्हा शल्य चिकित्सकांना योग्य उपचाराबाबत सूचना करून पहाटे ५ च्या सुमारास थेट जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. पण नियतीच्या ईच्छेपुढे कोणाचे काही चालले नाही. उपचार सुरू असतानाच ५.३५ वाजता स्वप्निल यांनी अखेरचा श्वास घेतला. एक सच्चा सहकारी गमावल्याचे दु:ख पचवून खा.नेते यांनी संध्याकाळी चामोर्शी गाठून वरघंटे कुटुंबियांचे सांत्वन करत दुःखात सामील होऊन त्यांना धीर दिला.

Share News

copylock

Post Top Ad

-->