दि. 25.02.2024
Vidarbha News India
आदिवासी समाज बांधवानी आपली संस्कृती जपावी असे विचार या देव भूमितून घेऊन जा; - आ. डॉ. देवराव होळी
- पारी कुपार लिंगो मॉ काली कंकाली देवस्थान कचारगड व जनजाती चेतना समिती गोंदिया जिल्हा यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते उदघाटन.!
विदर्भ न्यूज इंडिया
गोंदिया/सालेकसा : तालुक्यातील कचारगड येथे पारी कुपार लिंगो मॉ काली कंकाली देवस्थान कचारगड व जनजाती चेतना समिती, जिल्हा गोंदिया यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते उदघाट्न करण्यात आले. याप्रसंगी गेल्या पाच हजार वर्षांपासून या भूमीत आदिवासी देवतांची महा पूजा केली जाते या पावन भूमीत अनेक राज्यातून भक्तगण येत असतात भव्य दिव्य आदिवासी संस्कृती जपण्याचा निर्धार करून या पवित्र स्थानातून कचारगड यात्रे निमित्त जनजाती सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगले विचार घेऊन जा असे मार्गदर्शन आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले.
यावेळी प्रामुख्याने प्रांत संयोजक प्रकाशजी गेडाम, नाजूकजी कुमरे, लोकनाथजी तितराम, राजेंद्रजी बडोले, युमो उपाध्यक्ष प्रतीक राठी तथा भक्तगण उपस्थित होते.