भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल वरघंटे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : चामोर्शी येथील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा युवा सामाजिक कार्यकर्ता स्वप्नील वरघंटे यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने शुक्रवारी पहाटे 5.35 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. भाजपच्या युवा पदाधिकाऱ्याची ही अकाली एक्झिट धक्कादायक ठरली आहे. खासदार अशोक नेते यांचे ते जवळचे सहकारी होते.
वरघंटे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे कळताच खा.अशोक नेते यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना यांना योग्य उपचार मिळण्यासंबंधी सूचना करून जिल्हा सामान्य रूग्णालयाकडे धाव घेतली. परंतु हृदयविकाराचा झटका तीव्र असल्याने त्यांचा पहाटे मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. एकदा उमदा, निष्ठावंत सहकारी गमावला, अशी भावना व्यक्त करत खा.नेते यांनी त्यांना श्रद्धांजही वाहिली.