इपिलेप्सी आजाराबाबत जागरूकता वाढवा; मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे आवाहन.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

इपिलेप्सी आजाराबाबत जागरूकता वाढवा; मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे आवाहन.!

दि. 10 मार्च 2024 
Vidarbha News India 
इपिलेप्सी आजाराबाबत जागरूकता वाढवा; मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे आवाहन.!
विदर्भ न्यूज इंडिया 
गडचिरोली : आकडी, अपस्मार, फेफरे, फिट आदी इपिलेप्सी आजाराचे रूग्ण योग्य उपचाराने पूर्णपणे बरे होऊ शकतात, याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढविण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज केले.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग व इपिलेप्सी फाऊंडेशन यांचे सयुक्त विद्यमाने जिल्हा सामान्य रुग्णालय येथे अपस्मार, फिट, मिरगी या इपिलेप्सी आजाराचे निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर एकदिवसीय शिबीराचे उद्घाटन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. इपिल्पेसी फॉऊडेंशनचे अध्यक्ष डॉ. निर्मल सूर्या, आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. प्रमोद गवई, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतिशकुमार सोळंके, तसेच सामाजिक कार्यकर्ते हर्षबाबा आत्राम, लिलाधर भरटकर आदि यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
मंत्री आत्राम यांनी पुढे म्हणाले की इपिलेप्सी आजाराचे वेळीच निदान व औषधोपचार व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या कार्यात इपिलेप्सी संस्थेने मुंबई-चेन्नई येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त व दुर्गम भागात उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी संस्थेचे आभार व्यक्त करून रूग्णसेवेच्या याकार्यात शासनामार्फत आवश्यक सर्व मदत दिल्या जाईल याबाबत आश्वस्त केले.  
शिबीरात ० ते १८ वयोगटातील १२४ रुग्ण तसेच १८ वर्षावरील ८७ असे एकूण २११ ईपिलेप्सी रुग्णाची नोंदणी करण्यात आली. या रूग्णांवर डॉ. निर्मल सूर्या यांच्यासह डॉ. दिपक पलांडे, डॉ. वि.एस. मानेक, डॉ. गुहान राममुर्ती, डॉ.वसंत डांगरा, डॉ. निरज बहेती, डॉ. ध्रुव बत्रा, डॉ. अमित भट्टी, डॉ. मंगल कार्डीले या मुंबई, नागपूर व चेन्नई येथील प्रख्यात न्युरो सर्जन, न्युरोलॉजीस्ट, युरोलॉजीस्ट सॉयकालॉजीस्ट तज्ज्ञ व त्यांच्या चमूकडून उपचार करण्यात आले. रुग्णांना ई.ई.जी, रक्त तपासणी, समुदेशन, भौतिकोपचार, वाचा व भाषा विकार उपचार, ३ महिन्यांची औषधे इत्यादी सुविधा देण्यात आली.
यसाप्रसंगी शासकिय वैद्यकिय अधिकारी व खाजगी वैद्यकिय अधिकारी यांचेकरिता आयोजित ईपिलेप्सी विषयावरील कार्यशाळेचे ७४ वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. 
वैद्यकीय अधिक्षक डॉ. माधुरी किलनाके, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी, डॉ. प्रफुल हुल्के, डॉ. इंद्रजित नागदेवते, डॉ. मनिष मेश्राम, डॉ. मनिष नदंनवार, डॉ. विनोद मश्राखेत्री, डॉ. राहुल थिगळे, हेमलता सांगाळे, प्रशांत खोब्रागडे, रवी भडंगे,जयेश देशमुख यावेळी उपस्थित होते.

Share News

copylock

Post Top Ad

-->