दि. 10 मार्च 2024
गडचिरोली जिल्ह्यात 'विकासाचा झंजावात' असाच सुरू राहणार; आ. डॉ. देवराव होळी
- पंचायत समिती पोर्ला व धुंडेशिवणी परिसरात ४० कोटी रुपयांच्या कामांचे आ.डॉ. देवराव होळी यांनी केले भूमिपूजन व लोकार्पण.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील पंचायत समिती पोर्ला व धुंडेशिवणी परिसरात आमदार विकास निधी, रोजगार हमी योजना,बजेट, जिल्हा वार्षिक योजना, २५-१५, जन सुविधेची कामे, खणीकर्म, पाणीपुरवठा शाळा बांधकामासह अन्य विकास निधी योजनेअंतर्गत ४० कोटी रुपयांच्या विकास कामांचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी भूमिपूजन व लोकार्पण केले. या परिसराच्या विकासासाठी आपण निधी कमी पडू देणार नाही विकासाचा झंजावात असाच सुरू राहणार असे प्रतिपादन या भूमिपूजन व लोकार्पण प्रसंगी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती मारोतराव इचोडकर, उपसभापती विलास दशमुखे, पोर्ला सरपंच निवृत्ती राऊत, धुंडेशिवनी सरपंच भावना फुलझेले, भाजप नेते लोमेश कोलते, अशोक चापले, पंकज खेवले, संतोष दशमुखे, मनोज किरमिरे, पांडुरंग भोयर, पांडुजी सूर्यवंशी, भास्कर मेश्राम, विवेक भोयर ,ईश्वर राऊत, बाबू भाऊ फरांदे, श्रीधर शेजारे, तुकाराम फुलझेले, सुरेश रधये, मोहन रंधये, देविदास मडावी, सुखदेव कोवे, वामम गेडाम, कवळू रधये यांचे सह स्थानिक गावकरी उपस्थित होते.