नाट्य प्रयोगातील चांगले विचार आत्मसात करण्याची गरज; आमदार डॉ. देवराव होळी - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

नाट्य प्रयोगातील चांगले विचार आत्मसात करण्याची गरज; आमदार डॉ. देवराव होळी

दि. 10 मार्च 2024
Vidarbha News India 
नाट्य प्रयोगातील चांगले विचार आत्मसात करण्याची गरज; आमदार डॉ. देवराव होळी
- चिमूर विधानसभा क्षेत्रातील तळोधी (बाळापूर ) येथिल नाट्य प्रयोगाला आमदार डॉ. देवराव होळी यांची उपस्थिती.!
- जय श्रीराम नाट्य मंडल यांच्या सौजन्याने 'दोन घराच गाव' या नाट्य प्रयोगाचे आयोजन.!
विदर्भ न्यूज इंडिया 
चंद्रपूर : तळोधी (बाळापूर ) येथे जय श्रीराम नाट्य मंडल यांच्या सौजन्याने 'दोन घराच गाव' या नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते या नाट्य प्रयोगाचे अध्यक्ष आमदार डॉ. देवरावजी होळी हे होते याप्रसंगी नाटकाद्वारे, रंगभूमी कलाकार जीवनातील अनेक पैलू, वर्तन आणि नातेसंबंध शोधण्यासाठी, अनुभवण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि चाचणी करण्यासाठी काल्पनिक परिस्थिती निर्माण करतात. नाटकाची निर्मिती आणि सादरीकरण ही एक प्रक्रिया आहे. जेव्हा कलाकार सुरुवातीपासून या प्रक्रियेत सामील होतात, म्हणजे नाटक लिहिण्यापासून ते ते मांडण्यापर्यंत आणि ते सादर करण्यापर्यंत, तेव्हा त्यांना समज विकसित होते की आपली समाजव्यवस्था काय आहे?  आणि या चौकटीत त्यांचे स्थान काय आहे? या उद्देशाने या नाटकाला या स्पर्धेत स्थान देतात. असे मार्गदर्शन आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले.
याप्रसंगी दिवाकर निकुरे, संतोष रडके, राजेश दिघे, जगदीश सदमाके, संजय गजपुरे, भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, खोजाम मरस्कोल्हे, रमेश बोरकर, डॉ. सप्नील कामडी, पंचम खोब्रागडे, धनंजय बोरकर, हेमंत लांजेवार, प्रा. अतुल कामडी, डॉ. गौरव देशमुख, युमो उपाध्यक्ष प्रतीक राठी, खुशाल मदणकर, जितेश सयाम, तथा नाट्य रसिक उपस्थित होते.

Share News

copylock

Post Top Ad

-->