कांग्रेस नेते डॉ. नामदेव उसेंडी यांचा पक्षाला राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

कांग्रेस नेते डॉ. नामदेव उसेंडी यांचा पक्षाला राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश.!

दि. 26 मार्च 2024 
Vidarbha News India 
कांग्रेस नेते डॉ. नामदेव उसेंडी यांचा पक्षाला राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश.! 
विदर्भ न्यूज इंडिया 
प्रतिनिधी/गडचिरोली : लोकसभा उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य उफाळून आले आहे. डॉ. चंदा व डॉ. नितीन कोडवते यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी सुद्धा भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे येथे काँग्रेसला दुसरा धक्का बसला आहे. काँग्रेसने डॉ. नामदेव किरसान यांना उमेदवारी जाहीर केल्याने नाराज असलेले डॉ. उसेंडी यांनी काँगेस नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. तिकीट वाटपासाठी पक्षात पैशांचा निकष लावल्याचा दावा त्यांनी २६ मार्च रोजी केला आहे.
डॉ. नामदेव उसेंडी यांनी काँगेस आदिवासी प्रदेशाध्याक्षपदाचा राजीनामा दिला आहे. प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा अद्याप दिला नसून कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार, संदीप सुरजागडे आदी उपस्थित होते. डॉ. उसेंडी हे २००९ मध्ये काँग्रेसकडून गडचिरोली विधानसभा मतदासंघांतून निवडून आले होते. त्यानंतर २०१४ व २०१९ अशा दोन्ही वेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावले, पण त्यांना यश आले नाही.
दरम्यान, तिसऱ्यांदा ते काँग्रेसकडून इच्छुक होते, पण त्यांना डावलून प्रदेश महासचिव डॉ. नामदेव किरसान यांना संधी देण्यात आली. त्यामुळे नाराज असलेले डॉ. उसेंडी यांनी काँगेस आदिवासी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांवर गंभीर आरोप केले. पैशांच्या जोरावर उमेदवारी वाटप केली जात असल्याची आपल्याला शंका असल्याचा आरोप त्यांनी केला. दोन वरिष्ठ नेत्यांच्या गटबाजीत कुरघोडीच्या राजकारणातून आपल्याला डावलले गेले, असे ते म्हणाले. त्यानंतर डॉ. नामदेव उसेंडी यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपा पक्षात प्रवेश केला.

Share News

copylock

Post Top Ad

-->