गडचिरोली जिल्हा औद्योगिक क्रांतीने विकसित होईल; - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

गडचिरोली जिल्हा औद्योगिक क्रांतीने विकसित होईल; - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दि. 26 मार्च 2024 

Vidarbha News India 

गडचिरोली जिल्हा औद्योगिक क्रांतीने विकसित होईल; - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

Devendra Fadnavis : Gadchiroli 

विदर्भ न्यूज इंडिया 

गडचिरोली : पुढील पाच वर्षात गडचिरोली जिल्ह्याचे चित्र बदलले जाणार असून या जिल्ह्यात औद्योगिक क्रांती होईल आणि गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाचा मॉडेल आपण दाखवून देणार अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

भाजपचे उमेदवार अशोक नेते यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गडचिरोलीत आल्यानंतर त्यांच्या विजयाची संकल्प सभा येथील अभिनव लॉनमध्ये आज आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर उमेदवार अशोक नेते, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार बंटी भांगडीया, आमदार क्रिष्णा गजबे, सहकारमहर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार, राजे अंब्रीशराव महाराज, सहकार नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार, प्रमोद पिपरे, योगीता पिपरे, डॉ. चंदा कोडवते, डॉ. नितीन कोडवते आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना ना. फडणवीस म्हणाले की, केवळ गडचिरोलीत विद्यापीठ, विमानतळ, वैद्यकीय महाविद्यालय नाही तर याशिवाय गडचिरोली जिल्ह्यात औद्यागिक क्रांती व विकसित जिल्हा म्हणून गडचिरोलीची ओळख असेल आणि यासाठी भाजपचे उमेदवार अशोक नेते यांना निवडून देण्याची गरज आहे. ही लढाई आता केवळ अशोक नेतेंची राहीली नसून राहूल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी आहे. आणि तुम्हाला कोण हवे आहे हे ठरवावे लागेल, असेही ते म्हणाले. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, भाजपला मतदान करून विकासात गॅरंटीत सहभागी व्हायचे असेल तर अशोक नेते यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा. नेते नशिबवान आहेत कारण त्यांच्यासाठी गडचिरोलीत उपमुख्यमंत्री फडणवीस आले आहेत. Devendra Fadnavis यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी अशोक नेते यांच्या बाजून दोन राजे असल्याचे सांगून नेते यांना प्रचंड बहूमताने निवडूणन आणू असा विश्‍वास व्यक्त केला. या विजय संकल्प सभेत अशोक नेते यांनी सुद्धा मतदारांनी आपल्याला निवडून देण्याचे आवाहन केले. या विजय सभेत आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हेमंत जंबेवार यांचेही भाषणे झाली. यावेळी माजी आमदार प्रा. अतूल देशकर, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, किसन नागदेवे, मोतिलाल कुकरेजा, राजू जेठाणी, गीता हिंगे, मधूकर भांडकर, नंदू पेटेवार, अनिल पोहणकर, गोविंद सारडा आदींची उपस्थिती होती.


Share News

copylock

Post Top Ad

-->